Mumbai News : राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागेसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच बंडखोरीमुळे महायुती व महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज भरले आहेत तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या दोन मतदारसंघात जोरदार रस्सीखेच दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या तोडगा निघणार की मैत्रीपूर्ण लढत होणार यावरून उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena), काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने एकजुटीचा नारा दिला होता. आता मात्र दोन मतदारसंघातील उमेदवारीवरून आघाडीत बिघाडी झाली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून द्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत, तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या पाचही जागा एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांतच हे मतभेद उफाळून आले आहेत. यादरम्यान मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता, तर अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत 9 ऑक्टोबरची आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतानाही अमरावती आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघांतील उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
अमरावतीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच
काँग्रेसने (Congress) अमरावती शिक्षक मतदारसंघात अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दत्तात्रय लहाने यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांनी ६ ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. विशेष बाब म्हणजे, काँग्रेसने 3 ऑक्टोबर रोजीच अदिती पोहरे यांच्यासह नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिजित वंजारी आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.
अदिती पोहरे या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या असून त्यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या संस्थेच्या कर्मचारीवर्गात मोठ्या संख्येने शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे नोंदणीकृत शिक्षकांकडून पोहरे यांना स्थानिक पातळीवर चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे.त्याचवेळी अमरावतीच्या जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दावा ठोकला आहे. दत्तात्रय लहाने यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर पक्षाने ही जागा सोडण्यास नकार दिला आहे.
आघाडी पातळीवरील अंतिम निर्णयाची वाट न पाहताच तिन्ही पक्षांनी परस्पर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या शिवसेना अशी मैत्रिपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही या लढती टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडे 9 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांची नेमकी काय भूमिका असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.