Dinesh Waghmare on voters list Sarkarnama
महाराष्ट्र

Election Commission on voters list : मतदार यादीचा घोळ; राज्य निवडणूक आयुक्तांवर प्रश्नांच्या सरबती, सावरासावरीत केंद्रीय आयोगाकडे बोट...

Election Commission Dinesh Waghmare Reacts on Bogus Voters List in Mumbai : राज्यातील मतदार यादीतील घोळावरून महाविकास आघाडी आणि मनसने केलेल्या आरोपांवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

local body elections Maharashtra : राज्यामधील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज जाहीर केलं. परंतु मतदार यादींच्या घोळावर दिनेश वाघमारे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं.

सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 15 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादी मागितली होती. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही, असा मोठा खुलासा आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटले.

राज्यातील मतदार याद्यांच्या घोळाचे पडसाद राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करताना, आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उमटले. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मतदार यादी, आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतो, असे सांगून हात झटकले. यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबतीवर तेच-तेच उत्तर देत, सावरासावरी केली. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मतदार यादीतील घोळावर केलेल्या मागणीत, केंद्रीय निवडणूक आयोगाला संपर्क साधला असून, 15 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादी मागितली होती. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती दिली.

मतदार यादीतील दुबार, तिबास, बोगस मतदारांच्या (Voter) प्रश्नावर, दिनेश वाघमारे म्हणाले, "मतदार यादी आम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. मतदार यादीतील दुबार, तिबार मतदारांवर कारवाई करता येते. अशा मतदारांसंदर्भात आयोगाने टूल विकसित करत कारवाई सुरू केली आहे. तसंच काही चूक असेल, तर दुरुस्त करता येते, प्रभाग चुकलेले असेल, तर तो दुरुस्ती करतो. विधानसभा मतदार यादीत नाव आहे. पण या मतदार यादीत नाव घेता नाही, ते आम्ही दुरुस्त करतो."

मतदार यादीच्या घोळानंतर काही विरोधकांनी मतदानाला जाऊ नका, अशी आरोळी ठोकली आहे. त्याचा मतदानाच्या टक्क्यावर परिणाम होईल. यावर दिनेश वाघमारे म्हणाले, आम्ही मतदार जनजागृतीसाठी शिबिर घेत आहोत. दुबार-तिबार मतदारांपर्यंत पोचून कार्यवाही सुरू आहे. मतदार शुद्धीकरणावर भर आहे. तसंच एकाच घरात जास्त मतदार दाखवण्याच्या प्रकारावर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा केलेला आहे.

मतदारांना प्रलोभने दाखवणाऱ्यांवर आचारसंहितेनुसार कारवाई होणार असल्याचे सांगून, मद्य अन् पैशांचं वाटपाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या आहेत. पोलिसांना संपूर्ण अधिकार दिले असून, पंतसंस्था आणि बँकांच्या व्यवहारावर संपूर्ण लक्ष ठेवून असणार आहोत. पैशाची वाहतूक किंवा संशयास्पद ऑनलाईन व्यवहारांवर संपूर्ण लक्ष असणार आहे.

दिनेश वाघमारेंची तेच-तेच उत्तरे देताना दमछाक...

या मतदार यांद्यांच्या घोळानुसार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दुबार-तिबार मतदार होते का, या प्रश्नाव दिनेश वाघमारे यांनी मला त्यावर बोलण्याचा अधिकार नाही. दुबार-तिबार मतदार यादीत येणे ही नेमकी चूक कोणाची? या प्रश्नावर बोलताना, दिनेश वाघमारे यांनी सुरूवातील मोठा पाॅझ घेतला. आम्हाला ही निवडणूक यादी भारत निवडणूक आयोगाकडून मिळते. यादीत फक्त आम्ही दुरुस्ती करतो. यादीतील घोळाची जबाबदारी कोणाची? यावर दिनेश वाघमारे यांनी तेच-तेच उत्तर देत सावरासावरीची उत्तरं दिली. एकप्रकारने मतदार यादीतील गोंधळावरून होणाऱ्या प्रश्नांवर उत्तर देताना दिनेश वाघमारेंची चांगलीच दमछाक होताना दिसली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT