Nana Patole, Balasaheb Thorat Sarkarnama
महाराष्ट्र

MVA News : विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा प्लॅन ठरला; तीन पक्षाची समन्वय समिती घेणार निर्णय

Assembly Election News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. नुकतीच या बाबत महाविकास आघाडीची बैठक पार पडली.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात आघाडीला ३० जागा मिळाल्याने उत्साह वाढला आहे. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. नुकतीच या बाबत महाविकास आघाडीची बैठक पार पडली.

यावेळी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यात आली. त्यासोबतच लवकरच जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात होणार असल्याने आघाडीतील काँग्रेस (Congress), शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती समन्वयाचे काम करणार आहे. (MVA News)

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने तिन्ही पक्षातील प्रमुख नेते मंडळींवर समन्वयाची जबाबदारी देण्यात येणार आहे. नुकतीच नवी दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या बैठक झाली.

त्यामध्ये काँग्रेसकडून या समन्वय समितीमथ्ये काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या निवडणुकीसाठी आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. त्यावर येत्या काळात चर्चा होणार आहे. त्यापूर्वीच काही महत्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी व पुढील नियोजन ठरविण्यासाठी ही समिती काम करणार आहे.

महाविकास आघाडीचा चेहरा कोण असणार यावरून गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरु आहे. त्यावर अद्याप काही निर्णय झालेला नाही. त्याशिवाय जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत येत्या काही दिवसात महाविकास आघाडीची चर्चा सुरु होणार आहे. सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. आपल्या पक्षाच्या पदरात जास्त जागा पाडून घेण्यावर प्रत्येकाचा भर असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT