Shivajirao Adhalarao Patil : लोकसभेत पराभूत झालेल्या आढळरावांना मोठा दिलासा, 'या' पदावर लागली पुन्हा वर्णी

Shivajirao Adhalarao Patil Mhada president : लोकसभेपूर्वी आढळराव पाटील यांची नियुक्ती म्हाडाच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. मात्र, निवडणुकीसाठी त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळ' चिन्हावर शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा आढळराव पाटील यांचा पराभव केला. पराभवानंतर आढळराव पाटील हे बाजुला झाल्याचे चित्र असताना राज्य सरकारने त्यांची नियुक्ती म्हाडाच्या अध्यक्षपदी केली आहे.

लोकसभेपूर्वी आढळराव पाटील यांची नियुक्ती म्हाडाच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. मात्र, निवडणुकीसाठी त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदार संघामधून आढळराव पाटील हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्याने ऐन निवडणुकीपूर्वी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये पक्ष प्रवेश करावा लागला.

2019 च्या निवडणुकीप्रमाणेच या लोकसभा निवडणुकीत देखील शिवाजीराव आढळराव-पाटील आणि अमोल कोल्हे हे समोरासमोर ठाकले होते. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असे मत सर्वांचे होते. मात्र तब्बल 1 लाख 40 हजार मतांनी आढळराव पाटील यांचा पराभव झाला. निवडणूक प्रचारादरम्यान आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे देखील आढळराव पाटील यांनी सांगितलं होते.

Shivajirao Adhalrao Patil
Third Front Politics : आंबेडकर, शेट्टी, कडू महाविकास आघाडीचे गणित बिघडवणार! महायुतीच्या यशाची मदार तिसऱ्या आघाडीवर

निवडणुकीपूर्वी आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती राज्य सरकारने केली होती. मात्र, निवडणुकीमध्ये उभे राहताना आढळराव पाटील यांना हे पद सोडावे लागले. आढळराव यांच्या हातून तेलही गेले आणि तूपही गेलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. आता आढळराव पाटील यांची पुन्हा एकदा म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आढळराव पाटील यांना काहीसा दिलासा मिळाल्याचं बोलले जात आहे.

विधानसभेसाठी ताकद

आढळराव पाटील हे लोकसभेला पराभूत झाले असले तरी त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघात माननारा मोठा वर्ग आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यामुळे विधानसभेला शिरुर लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा जागांवर आढळराव यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे पुन्हा एकदा आढळराव पाटील यांच्याकडे म्हाडाचे अध्यक्षपद दिल्याची चर्चा आहे.

(Edited By Roshan More)

Shivajirao Adhalrao Patil
Manikrao Kokate: निधीवरुन मंत्र्यांचे नखरे, आता तरी सुधरा; नाहीतर निवडणुकीनंतर रस्त्यावर यावं लागेल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com