Prakash Ambedkar News  Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar News: महाआघाडीच्या बैठकीला ‘वंचित’ अनुपस्थित; जयंतरावांच्या फोननंतर आंबेडकर म्हणाले....

MVA Meeting Prakash Ambedkar: मविआच्या बैठकीस उपस्थित राहणे शक्य नसल्याचे आंबेडकरांनी म्हटलं आहे. ही बैठक मंगळवारऐवजी बुधवारी घेण्यात यावी...

Mangesh Mahale

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागावाटपाबद्दल चर्चा सुरू आहे. उद्या (मंगळवारी) याबाबतची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.MVA Meeting Prakash Ambedkar

राज्यातील निवडणुकामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश आहे. मात्र, उद्या होणाऱ्या मविआच्या बैठकीस वंचित आघाडी उपस्थित राहणार नाही. याचे कारणही आंबेडकरांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फोन करून प्रकाश आंबेडकर यांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीची मंगळवारी सायंकाळी पुण्यात सत्ता परिवर्तन महासभा होणार आहे. त्याला राज्य समिती हजर राहणार आहे. त्यामुळे मविआच्या बैठकीस उपस्थित राहणे शक्य नसल्याचे आंबेडकरांनी म्हटलं आहे. ही बैठक मंगळवारऐवजी बुधवारी घेण्यात यावी, असे आवाहन त्यांनी जयंत पाटील यांना केले आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) महिनाभरापूर्वी बैठक झाली होती. बैठकीमध्ये तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. महाराष्ट्रामधून महाविकास आघाडीतर्फे इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला जागा देण्याची तयारी आहे. मात्र, काँग्रेस आणि ‘वंचित’मधील वाद हे काही केल्या संपताना दिसून येत नाही. निमंत्रण असूनही आंबेडकर त्या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे आंबेडकरांच्या मनात नेमकं काय चालू आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला गेला आहे. (Mahavikas Aghadi Meeting )

25 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीकडून कोणीही उपस्थित नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक पत्र ट्विट केलं होते. ज्यात त्यांनी ‘वंचित’ला बैठकीसाठी आमंत्रित केले होते. मविआ नेत्यांकडून हे आमंत्रण प्रकाश आंबेडकरांना दिलं गेलं होतं. या पत्रावर नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या सह्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT