Supreme Court of India to hear plea related to Nagar Panchayat election result declaration today. Sarkarnama
महाराष्ट्र

Nagar Panchayat Result : नगरपरिषद अन् नगरपंचायतीच्या निकालाचा आजच फैसला, सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार?

Nagar Panchayat Election Supreme Court : नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले होते. मात्र, त्याविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे.

Roshan More

Nagar Panchayat News : नगरपंचायत आणि नगपरिषद निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान झाले. हे मतदान होत असताना नागपूर खंडपीठाने निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबरला जाहीर न करता 21 डिसेंबरला जाहीर करण्याचा निर्णय दिला. या निर्णयाने उमेदवार अस्वस्थ आहेत. मात्र, नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात आता याचिका करण्यात आली आहे.

नागपूर खंडपीठाचा निर्णय रद्द करून तत्काळ मतदान झालेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदांचे निकाल जाहीर करावेत, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज (शुक्रवार) सुनावणी होणार आहे. त्या्मुळे निकाल जाहीर करण्याबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

50 टक्के आरक्षणाची मर्यादा तसेच इतर तांत्रिक कारणामुळे निवडणूक आयोगाने मतदानाच्या एक दिवस आधी काही नगरपंचायत आणि नगरपरिषांसाठीचे मतदान 20 डिसेंबरला घेण्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे राजकीय पक्षांकडून नाराजी व्यक्त केली जात असताना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सर्व नगपंचायत आणि नगपरिषदांचे निकाल 21 जाहीर करण्याचे आदेश दिले.

21 डिसेंबर आधीच निकाल...

नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटले होती की, सरकार या निर्णयाविरोधात कोर्टात जाईल. त्यामुळे 21 डिसेंबरही निकालाची तारीख असतील तरी त्या आधीच निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारच्या आधीच एक याचिका सुप्रीम कोर्टात करून निकाल तत्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सर्व निकाल 21 डिसेंबरला का?

24 नगरपंचायत, नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाटी तसेच 76 नगरपालिकेतील 154 सदस्यांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. जर दोन डिसेंबरला मतदान झालेल्या नगपंचायत आणि नगरपालिकांचे निकाल तीन डिसेंबरला जाहीर केले असते तर 20 डिसेंबरला होणारे मतदान करणारे मतदार त्यामुळे प्रभावित झाले असते, असा युक्तिवाद 21 डिसेंबरला सर्व निकाल एकत्र जाहीर करण्यामागे केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT