

Pune News : पुणे महापालिकेची आचारसंहिता डिसेंबर महिन्यात लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राजकीय घडामोडींनी वेग आला आहेच, पण आता महापालिका प्रशासनाची ही लगबग सुरु झाली आहे.
आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिकेच्या १२५० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा धडाका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाकडून कामे लवकर पूर्ण करण्याची लगबग सुरु असून, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भात बैठका घेऊन कामाचा आढावा घेतला.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षित प्रभाग अंतिम झाले आहेत. पुढील दोन आठवड्यात मतदार यादीही अंतिम होणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठीची तयारी बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या निवडणुका आधी होतील अशी चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये महापालिका निवडणुकीचा आचारसंहिता डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होऊ शकते अशी चर्चा राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले जाईल. यामध्ये समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधलेल्या 20 पाण्याचे आणि पाणी वितरण व्यवस्थेतील 40 झोनचे लोकार्पण याचा समावेश असून, त्याचा खर्च सुमारे 450 कोटी रुपये इतका आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर 53 कोटी, जागतिक सायकल स्पर्धेचा मार्ग 145 कोटी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प 13. 21 कोटी, खराडी, चांदणी चौक आणि बाणेर येथील अग्निशामक केंद्राचे उद्घाटन 25 कोटी, अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ए व बी विंगचे लोकार्पण 130 कोटी, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची इमारत २० कोटी रुपये असे एकूण 836 कोटी रुपयांच्या कामाचे लोकार्पण होणार आहे.
बिंदू माधव चौकातील उड्डाणपूल आणि समतल विलगक आणि आचार्य आनंद ऋषिजी महाराज चौक (पुणे विद्यापीठ चौक) येथील उड्डाणपूल व समतल विलगक या150 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. शेवाळवाडी येथील पाणी पुरवठा प्रकल्प 35 कोटी, मुंढवा केशवनगर टाक्या आणि जलवाहिनीच्या कामाची सुरुवात 27 कोटीचे, अमृत 2 योजनेतून वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे 200 कोटी रुपयांचे काम होणार आहे. असे एकूण 413 कोटी रुपयांच्या कामाचे भूमीपूजन होणार आहे.
‘‘पुणे महापालिका (PMC) निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही काळात लागू शकते. त्यापूर्वी शहरातील जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत त्यांचे लोकार्पण तर काही प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. ही सुमारे 1200 कोटीची कामे असणार आहेत. त्याचा आढावा घेण्यात आला आहे.’’
- नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.