Nagpur Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीत सध्या नागपुरात नवीन वादाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजकारणामुळे मित्रांमध्ये, नातेसंबधात फूट पडते हे आपल्याला माहीत आहे. पण नागपुरात हा राजकीय संघर्ष पती-पत्नीच्या नात्यापर्यंत पोहचला आहे. महापालिका निवडणुकीमुळे त्यांच्या संसारात फूट पडण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पतीने पक्षातून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीने त्याचं घर सोडून थेट माहेर गाठलंय. नागपूरच्या भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या कुटुंबात हा प्रकार घडला आहे. अर्चना डेहनकर या माहेरी गेल्या आहेत.
त्यांचे पती विनायकराव डेहनकर यांनी भाजपविरुद्ध बंडखोरी केली आहे. एका बाजूला पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि दुसऱ्या बाजूला पतीचा निर्णय, अशा कोंडीत सापडलेल्या माजी महापौरांनी माहेरी जाणे पसंत केले आहे. अर्चना डेहनकर यांना भाजपने 2009 ते 2012 या काळात महापौरपद दिले, त्यामुळे पक्षाच्या विरोधात जाणे त्यांना चुकीचे वाटते.
त्यांचे पती विनायक डेहनकर यांनी वॉर्ड 17 मधून पक्षाचे तिकीट मागितलं होतं. पण त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अर्चना या माहेरी गेल्याच्या वृत्ताला विनायक डेहनकर यांनी दुजोरा दिला आहे.
"घरात परस्परविरोधी भूमिका नको म्हणून आपणच बायकोला 8-10 दिवसांसाठी माहेरी पाठवलं असल्याचा दावा विनायक डेहनकर यांनी केला आहे. असे असले तरी नागपुरात मात्र या घटनेची प्रचंड चर्चा रंगली आहे. 'ती माहेरी गेली आहे पण यात माझी काहीच चूक नाही,'अस विनायकरावांनी स्पष्ट केले आहे.
बंडखोरी केल्यानंतर विनायक डेहनेकर यांनी माध्यमांना स्पष्टीकरण दिले. घरातील कपाटात साठवलेली पक्षाची उपरणे, पदवीधर निवडणुकीसाठी गोळा केलेले अर्जांचे गठ्ठे दाखवताना विनायक यांना रडू कोसळले. "अनेक वर्षे ज्या पक्षासाठी काम केले, त्याच पक्षाने अखेरच्या क्षणी पाठ फिरवली, असे सांगताना त्यांना रडू कोसळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.