Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापुरात विरोधकांना देणार 'मिसळचा ठसका'

CM Devendra Fadnavis Kolhapur Public Meeting: महायुतीकडून कोल्हापूरच्या मिसळचा कट्टा प्रचारात आणण्याचे नियोजन केले आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी ही एक नवी थीम घेऊन प्रचार होणार आहे. विरोधकांना मिसळीचा ठसका देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 2 जानेवारीला अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिकेचा रणांगणाला सुरवात होणार आहे. महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि लढाई होणार असल्याने एकेक मतदारसंघात ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे.

पुढील बारा दिवस प्रचाराला मिळणार असल्याने अनेक मातब्बर नेते हा महापालिकेचे मैदानात प्रचारासाठी पाहायला मिळणार आहेत. कोल्हापुरात महायुतीकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोफ धडाडणार आहे. पण यंदा प्रचाराचा नवा फंडा घेऊन भाजप या रणांगणात उतरणार आहे. कोल्हापुरी मिसळचा झटका देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १२ जानेवारील कोल्हापुरात 'मिसळ कट्टा' निमित्ताने कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहेत.

कोल्हापुरातील निवडणुकीतील एखादा 'स्लोगन' राज्यात 'फेमस' होतो. कोल्हापुरातील प्रचाराची थीम नेहमीच राज्यभर चर्चेत असते. यावेळी महायुतीकडून कोल्हापूरच्या मिसळचा कट्टा प्रचारात आणण्याचे नियोजन केले आहे.

महायुतीच्या उमेदवारांसाठी ही एक नवी थीम घेऊन प्रचार होणार आहे. विरोधकांना मिसळीचा ठसका देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. शहरातील एका ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात हजार व्यक्ती असतील. प्रत्येक प्रभागात याचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे.

Devendra Fadnavis
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत भाजपचा डाव फसला; ‘इंडिया आघाडी’चा 4 पैकी 3 जागांवर दणदणीत विजय...

एकनाथ शिंदे, अजित पवार यांची सभा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात जानेवारीला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार याची नऊ जानेवारीला सभा नियोजित आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे शहरातील एका ठिकाणी थांबणार आहेत. तेथे शहरातील सुमारे हजार 'ओपीनियन मेकर' उपस्थित असतील. तीन व्यक्तींकडून मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली जाईल. याला 'टॉक शो' असे नाव दिले आहे.

या मुलाखतीतून कोल्हापुरातील महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार होणार आहे. याचवेळी राज्याचे संदर्भ येथे असणार आहेत. १२ जानेवारीला दुपारी हा मिसळ कट्टा भरणार आहे. याचे थेट प्रक्षेपण प्रत्येक प्रभागात केले जाणार आहे. यासाठी स्क्रिनची व्यवस्था केली जाणार आहे. कोल्हापुरातील प्रचाराची थीम वेगळी आणण्याच्या दृष्टिकोनातून 'मिसळ कट्टा' होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून ही थीम ठरली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनीही याला होकार दिला आहे. महायुतीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदेही येणार आहेत. त्यांची जाहीर सभा सात जानेवारीला होणार आहे. ही सभा कोणत्या ठिकाणी घ्यायची, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, दौरा निश्चित झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा नऊ जानेवारीला निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही तारीख निश्चित मानली जात असली तरीही त्याला अद्याप अधीकृत दुजोरा मिळालेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com