Nagpur Violence latest update  Sarkarnama
महाराष्ट्र

Nagpur Violence: नागपूर का पेटलं? स्थानिक भाजप आमदाराचा मोठा दावा; प्रत्यक्षदर्शींनी काय अनुभवलं

Nagpur Violence latest update Dispute Between Two Groups: नागपूर दंगलीत एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि 8 ते 10 पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे ४ कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Mangesh Mahale

Nagpur, 18 March 2025: औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादाला सोमवारी नागपुरात हिंसक वळण लागलं. सोमवारी रात्री याच मुद्यावरुन नागपूरच्या महाल भागात दोन गटात तुफान दगडफेक झाली. दगडफेक करीत समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड केली, काही वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले. भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी या दंगलीबाबत मोठा खुलासा केला आहे.

पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करीत आत्तापर्यंत सुमारे 50 जणांना ताब्यात घेतलं आहे. आता नागपुरात संचारबंदी लावण्यात आली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. महाल परिसरात तगडा बंदोबस्त आहे.

काही जणांनी पोलिसांवरही हल्ला केला आहे. या हल्लात एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि 8 ते 10 पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे ४ कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागपूरचे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

नागपूरच्या महल परिसरातील घरे आणि वाहने जाळण्याबाबत प्रवीण दटके मोठे विधान केले आहे. आमदार प्रवीण दटके यांना दावा केला आहे की बाहेरुन आलेल्या काही व्यक्तींनी घरांना आणि वाहनांना आग लावली. सकाळी याविरोधात आंदोलन करण्यात आले, पोलिसांनी हस्तक्षेप करुन संतप्त नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री महल परिसरात दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली.

हंसरपुरी येथे झालेल्या हिंसाचारात बाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की आमच्या परिसरात काही समाजकटंक आले होते त्यांनी हा प्रकार केला आहे. एक टोळी आली होती त्यांच्या चेहऱ्यावर स्कार्फने झाकलेला होता. त्यांच्या हाताता धारदार हत्यारे होती. त्यांनी परिसरात गोंधळ केला. घरे, दुकाने,वाहनांवर दगडफेक केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT