MLC Election : "मी कोणाचं उष्ट खात नाही" : शिंदेंकडून उमेदवारी जाहीर होताच रघुवंशींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Maharashtra MLC Election 2025 Chandrakant Raghuwanshi Old Video Viral:पक्षाला मला पद द्यायचे असेल तर मी मला सहा वर्षांची आमदारकी देतील, तरच मी ती स्वाकारले, " असे ठामपणे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी सांगितले होते.
Chandrakant Raghuwanshi
Chandrakant RaghuwanshiSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. यापूर्वीही झालेल्या विधान परिषदेच्या निव़डणुकीसाठी त्यांचे नाव चर्चेत होते. नुकत्याच झालेल्या विधान सभा निवडणुकीच्या वेळी त्यांना विधान परिषद आमदारकी बाबत विचारले असता त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

आमदार आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेची राजीनामा दिल्यानंतर या रिक्त जागेसाठी चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या आमदारकीबाबत त्यांना काही महिन्यापूर्वी विचारले होते.

तेव्हा "मी आयुष्यात कधीही कुणाचं उष्ट खातं नाही. आमश्यादादांच्या (आमश्या पाडवी) राहिलेल्या तीन वर्षांच्या जागेसाठी चंद्रकांत रघुवंशी आमदार होणार नाही. ते पद मी स्वीकारणार नाही. एवढा मी स्वाभीमानी आहे. पक्षाला मला पद द्यायचे असेल तर मी मला सहा वर्षांची आमदारकी देतील, तरच मी ती स्वाकारले, " असे ठामपणे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी सांगितले होते.

Chandrakant Raghuwanshi
Supriya Sule: ‘बरं झालं पक्ष फुटला, राष्ट्रवादीच्या फुटीवर सुप्रियाताईं म्हणाल्या, 'अशा फालतू माणसाबरोबर...'

आता पुढील विधान परिषदेची निवडणूक ही मे 2026 मध्ये आहे. त्यामुळे साधारण वर्षभरच आमदारकी राहणार आहे, असे असताना सुरवातीला सहा वर्षांची आमदारकी पाहिजे असे म्हणणारे चंद्रकांत रघुवंशी यांनी वर्षभरासाठी आमदारकी का स्वीकारली, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. सोशल मीडियावर त्यांचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेचे धुळे – नंदुरबारचे संपर्क प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळला, अशी भावना रघुवंशी यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली आहे.

या जागेसाठी मुंबईतील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या नावाचीही चर्चा होती. आमशा पाडवी हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून निवडून आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com