Nagpur Violence sarkarnama
महाराष्ट्र

Nagpur Violence : नागपुरात हिंसाचार, एकास अटक, तणावपूर्ण परिसरातील शाळा बंद

Violence Broke Out In Nagpur : शहरातील महाल परिसरात वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली, यामुळे पोलिसांच्या आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार आणि अश्रूधूर सोडण्यास सुरुवात केली.

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी उसळलेला दंगलीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शहरातील मुस्लिम बहुल परिसरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार परिमंडळ 3 आणि परिमंडळ 4 मधील तीन पोलिस ठाण्यांतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

औरंजेबाच्या कबरीच्या वादातून एक गटाने केलेल्या निषेध आंदोलनानंतर सोमवारी दुपारपासून महाल परिसरात तणावाचे वातावरण होते. सायंकाळी सात वाजतनंतर एक समुदायातील काही युवकांनी भालदारपुरापासून निघून महाल परिसरात वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक सुरू केली. यावेळी पोलिसांच्या आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार आणि अश्रूधूर सोडण्यास सुरुवात केली. मात्र, मोठ्या प्रमाणात युवक शस्त्रासह रस्त्यावर उतरल्याने पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी बराच वेळ लागला. रात्री उशिरापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू करीत आरोपीची धरपकड सुरू केली.

दरम्यान पोलिसांनी मुस्लिमबहुल परिसरात पोलिसांनी कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार परिमंडळ तीनमध्ये संपूर्ण ठाण्यांतर्गत कलम 144 नुसार संचारबंदी लागू असून परिमंडळ 4 मध्ये सक्करदरा, नंदनवन आणि वाठोडा परिसरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

बाहेर न पडण्याचे आदेश

ज्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या भागात पोलिसांकडून फिरून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

गणेशपेठमध्ये गुन्हा दाखल

औरंजेबाची कबर तोडण्यासाठी एक गटाकडून केलेल्या आंदोलनात चादर जाळल्याच्या वादातून दुसऱ्या समुदायाने गणेशपेठ पोलिस ठाण्याला घेराव करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी एक युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

परिसरातील शाळा बंद

ज्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्या भागातील शाळा बंद करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT