Sarkarnama
महाराष्ट्र

Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी खूशखबर! खात्यात थेट जमा होणार 4000? 'नमो शेतकरी' योजनेबाबत सरकारची नवी अपडेट!

Namo Shetkari beneficiary list : नमो शेतकरी योजनेबाबत केंद्र सरकारची मोठी अपडेट समोर आली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. पात्रता, हप्ता आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Rashmi Mane

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या 'पीएम किसान' योजनेसोबतच राज्य सरकारच्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचा प्रलंबित हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात एकाचवेळी 4,000 रुपये जमा होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी 'पीएम किसान' योजनेअंतर्गत 2,000 रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारच्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचा आठवा हप्ता अद्याप वितरित झालेला नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे 90 लाख शेतकरी या निधीची प्रतीक्षा करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून स्वातंत्र्यदिन किंवा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी लवकरच सरकारकडून सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा केली जाते. यंदाच्या वर्षातील पहिला हप्ता यापूर्वी वितरित करण्यात आला असून पुढील हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे.

याच पार्श्वभूमीवर आठवा आणि नववा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकाचवेळी 4,000 रुपये जमा होऊ शकतात. मात्र, यासंदर्भातील अंतिम निर्णय आणि तारीख सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.

खात्यात हप्ता जमा झाला आहे की नाही, हे शेतकरी घरबसल्या तपासू शकतात. त्यासाठी 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून लॉगिन करावे. आवश्यक माहिती भरल्यानंतर लाभार्थ्यांना हप्त्याची सद्यस्थिती आणि निधी जमा झाल्याची माहिती ऑनलाइन पाहता येईल. त्यामुळे कोणतीही अफवा न मानता शेतकऱ्यांनी सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT