Namo Shetkari Yojana Benefit to Stop for Loan Waiver Farmers AI
महाराष्ट्र

Namo Shetkari Yojana: कर्जमाफी घेणाऱ्या 'नमो शेतकरी'चा लाभ बंद? 56 लाख शेतकरी एका वर्षासाठी बाद ठरणार

Namo Shetkari Yojana Benefit to Stop for Loan Waiver Farmers: कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ एका वर्षासाठी मिळणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.

Mangesh Mahale

Farm Loa nWaiver News: शेतकऱ्यांसाठी धक्कादायक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्यांना शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ नाही, असे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले, कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना वर्षाला मिळणारी 6 हजार रुपयांची मदत थांबणार आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेचे लाभ घेणारे 56 लाख शेतकरी नमो योजनेतून एका वर्षासाठी बाद होणार आहेत. तर दुसरीकडे कमी लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना हा निधी सुरू ठेवण्याचा विचार कृषी विभाग करीत असल्याची माहिती आहे. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. सरकारने नुकतीच कर्जमाफी जाहीर केली आहे. ही आनंदाची बातमी समोर असताना शेतकऱ्यांच्या एका डोळ्यात आनंदाश्रू तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू असल्याचे चित्र आहे. कारण नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणारे 56 लाख शेतकरी या योजनेतून बाद ठरणार का? या संभ्रमात शेतकरी वर्ग आहे.

वर्षभरातील सहा हजार रुपये मिळणार ती नाही, असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत. सरकारकडे नमो निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. पण संबधित खात्याकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही. याबाबत सरकारकडून अद्याप कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

राज्य सरकारच्या सहकार विभागामार्फत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेत कर्जमाफीसोबतच वन टाइम सेटलमेंट (OTS) आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाचाही समावेश करण्यात आला आहे.

योजनेच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक (AgriStack) पोर्टलवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली आहे, त्यांनीही आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

56 लाख शेतकऱ्यांना लाभाचा अंदाज

या योजनेचा राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. त्यापैकी 32 लाख शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या 24 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राज्य सरकारकडून सुमारे 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठीही विशेष तरतूद

ज्या शेतकऱ्यांवर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे, त्यांच्यासाठीही या योजनेत स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांनी 2 लाखांवरील थकीत रक्कम स्वतः भरावी लागेल. त्यानंतर शासनाकडून योजनेतील नियमांनुसार 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा भार उचलला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT