Nagpur News : युवक काँग्रेसमधील साठ पदाधिकाऱ्यांची पदमुक्ती आणि त्यानंतर चार पदाधिकाऱ्यांना संघटनेतून कायमस्वरूप निष्कासित करण्यात आल्याने सध्या चांगलाच वाद रंगला आहे. त्यामुळे याची दाखल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा घ्यावी लागली. आपण युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत चर्चा केली आणि दोषी नसतील तर कारवाई करण्यात येऊ नये असे, संकेत पटोले यांनी दिले आहेत.
युवक काँग्रेसच्यावतीने सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले होते. या आंदोलात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सचिव सहभागी झाले होते. मात्र या आंदोलनात जेमतेप ५० पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे तडकाफडकी ६० पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याचे आदेश प्रदेश प्रभारी यांनी काढले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाला राऊत यांच्या सांगण्यावरून ही कार्यवाही करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांच्या विरोधात दिल्लीत तक्रारी करण्यात आल्या होत्या. यानंतर प्रदेश क कार्यकारी अध्यक्ष म्हणून शिवराज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. याचे सर्वांनी स्वागत केले होते.
मात्र दोन दिवसांपूर्वी पक्षशिस्त मोडल्याचे कारण देऊन चार पदाधिकाऱ्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली होती. कारवाईच एक प्रत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठवण्यात आली होती. तत्पूर्वी साठ पदाधिकाऱ्यांच्या पदमुक्त केले यावर नाना पटोले यांनी आमच्या पक्षात लोकशाही आहे एवढेत त्रोटक उत्तर दिले होते. मात्र युवक काँग्रेसने निष्कासित करण्यात आसलेल्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत नोट पटोले यांना पावल्याने त्यांनाही याविषयावर आता मत व्यक्त करावे लागले.
युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, महासचिव अनुराग भोयर, सचिव अक्षय हेटे आणि नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांना कायमस्वरुपी निष्काशित करण्यात आले आहे. या सर्वांना त्यांची बाजू मांडण्यासाठी दिल्लीत बोलावण्यात आले आहे. मीडियाला बाईट दिला म्हणून निष्काशित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. कोणाला कायम स्वरुपी पक्षातून निष्काशित करण्यापूर्वी नोटीस धाडावी लागते. पक्षशिस्त पालन समितीकडे तक्रार करावी लागते. समिती सुनावणी नंतर आपला अहवाल अध्यक्षांना सादर करते. त्यानंतर कार्यवाही केली जाते अशी नियमावली युवक काँग्रेसच्या घटनेमध्ये आहे. त्यामुळे निष्काशनाची कार्यवाही बेकायदेशीर असल्याचा दावा केला जात आहे.
प्रदेश अध्यक्ष असताना कुणाल राऊत यांनी काहीच काम केले नाही. एकही मोठे आंदोलन केले नाही. आता त्यांना पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढायची आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांना बदनाम करण्याचे, पक्षातून काढून टाकयचे असे उद्योग त्यांचे सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. नाना पटोले यांची सुचनेवर राष्ट्रीय अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.