Nana Patole : सुप्रीम कोर्टाने तारीख पुढे ढकलली अन् नाना पटोलेंची शंका खरी ठरली, कार्यकर्ते अस्वस्थ!

Nana Patole Municipal Elections : विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागले होते. नवीन सरकारसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही एप्रिलमध्ये निवडणुक होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole : महाविकास आघाडीचे सोडा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चिंता करा. त्या होतील की नाही हे सांगता येत नाही, अशी शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली होती. त्यातच ओबीसी आरक्षणावरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने तब्बल एक महिना पुढे ढकलली आहेत. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागले होते. नवीन सरकारसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही निवडणुकीची शक्यता व्यक्त केली. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक होण्याबाबत नवीन सरकार स्थापन झाल्यापासून शंका उपस्थित केली.

जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची तारीख दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता निवडणुका कधी व कशा होतील, याची चर्चा सुरू झाली. निवडणुकीची शक्यता आणि प्रभागाच्या सीमेचा अंदाज घेऊन इच्छुकांनी आतापर्यंत चार-पाच वेळा मतदारसंघांची बांधणी केली.मात्र, निवडणूक पुढे गेल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.

Nana Patole
Ajit Pawar : अजितदादांचा वादा ठरला पक्का...जिल्हा बँकेला मिळणार उभारी!

महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांची साडे तीन-चार वर्षांपासून तयारी चालली आहे. महाविकास आघाडीच्या काळात नव्याने प्रभाग रचना करण्यात आली. चारऐवजी तीन सदस्यांचा प्रभाग राहील, असे जाहीर झाले. दरम्यान, ओबीसींसाठी राखीव जागांचा मुद्दा न्यायालयात गेला.

सुरुवातीच्या काळात काँग्रेस, भाजपसह प्रमुख पक्षांनी ओबीसींच्या राखीव जागांवर ओबीसीच उमेदवार देण्याची तयारी देखील दर्शवली होती. मात्र, निवडणूक झालीच नाही. यानंतर दर सहा महिन्यांनी निवडणुकीची चर्चा होऊ लागली.महायुतीची सत्ता आल्यानंतर परत 2017 च्या रचनेनुसार चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होण्याची शक्यता बळावली. त्यामुळे प्रशासनाने आघाडीच्या काळात केलेली तयारी मागे पडली.

Nana Patole
Sanjay Shirsat : हो, खैरेंना ऑफर दिली होती; ती स्वीकारली असती तर आज ते खासदार असते !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com