Nana Patole sarkarama
महाराष्ट्र

Nana Patole on Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेससोबत होणार दगा फटका? ; पटोले म्हणतात, 'सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा..'

Pradeep Pendhare

Congress and Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसणार असल्याच्या संकेत मिळत आहेत. काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात असलेल्या प्रज्ञा सातव यांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी हा चुकीचा नॅरेटिव्ह सत्ताधाऱ्यांनी सेट केला आहे. महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येतील हे 'फिक्स' आहे, असा दावा केला आहे.

तर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी निर्णायक आकडा गाठण्याची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसमध्ये अजित पवार आणि अशोक चव्हाण(Ashok Chavan) समर्थक आमदार आहेत. यातून काँग्रेसलाच धोका होऊ शकतो, असे संकेत मिळत आहे यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. "हा चुकीचा नरेटिव्ह सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी सेट केलाय. काँग्रेस, शिवसेना आणि शेकपचा, असे तिन्ही महाविकास आघाडीचे उमेदवार विधान परिषद निवडणुकीत निवडून येतील", असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 12 उमेदवारांचे अर्ज आहेत. निवडणूक 12 जुलैला होईल. या निवडणुकीची बांधणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. आपल्या उमेदवाराला धोका होऊ नये यासाठी चाचपणी सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज आहे. याचवेळी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव(Pragya Satav) यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे.

मिलिंद नार्वेकर यांच्या विजयासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः मैदानात उडी घेतली आहे. कोणताही दगाफटका नको म्हणून ते स्वतः आमदारांच्या संपर्कात आहेत. वेळप्रसंगी शिवसेना ठाकरे पक्षाच्या सर्व आमदारांना एकत्रपणे हलवण्याचीही तयारी असल्याचे दिसत आहे. असे असले तरी दोन्ही शिवसेनेचे आमदार एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी शिवसेनेत नेमके काय होईल, याची उत्सुकता आहे.

दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी देखील माझ्या उमेदवारी बाबत काँग्रेसने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. असे म्हणून आभार मानले. तसेच विजयाबाबत मी निश्चिंत आहे. पडद्या आडून अनेकांची मदत होत आहे. काँग्रेस उमेदवार विजयासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole), विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार आणि ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसमधील अजित पवार आणि अशोक चव्हाण समर्थक आमदार यांच्यावर विशेष करून लक्ष दिले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाने देखील आपापल्या आमदारांना निवडणुकीच्या अनुषंगाने अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या आठवड्यात मॅरेथॉन बैठकानंतर आज महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीबरोबर विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आमदारांशी संवाद साधला जाणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT