Pradnya Satav on Vidhan Parishad : ...अखेर काँग्रेसचं ठरलं, प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर!

Congress and Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी महायुती, महाविकास आघाडीकडून उमेदवार ठरवले जात आहेत.
MLA Pradnya Satav News
MLA Pradnya Satav NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीनंतर महाराष्ट्रात पहिली निवडणूक पार पडली ती शिक्षक-पदवीधर मतदारसंघांची ज्याचे आज निकाल समोर येत आहेत. तर दुसरीकडे भाजप पाठोपाठ काँग्रेसकडूनही विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. 

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुती, महाविकास आघाडीकडून उमेदवार ठरवले जात आहेत. भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर करत बाजी मारली. महायुतीतील शिंदे गट, अजित पवार यांनी अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेवर पुन्हा एकदा विद्यमान आमदार प्रज्ञा सातव(Pradnya Satav) यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

MLA Pradnya Satav News
Pradnya Satav : प्रज्ञा सातव विधान परिषदेसाठी पुन्हा इच्छुक, पटोले म्हणतात हायकंमाड निर्णय घेईल...

या आधाी काँग्रेसचे दिवंगत विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांच्या रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. कोरोना संसर्गामुळे काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचे अचानक निधन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती.

MLA Pradnya Satav News
Mahavikas Aghadi : 'मविआ'त ठिणगी! प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा, ठाकरेंच्या खासदाराची काँग्रेसकडे तक्रार; कारण...
Pradnya Satav
Pradnya SatavSarkarnama

काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबाशी राजीव सातव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राष्ट्रीय युवक काँग्रेसची मोठी जबाबदारी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजीव सातव यांच्यावर सोपवली होती. याशिवाय राज्यसभेवर निवड, गुजरात विधानसभा निवडणुकीची जबाबदारी, राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देत राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्यावर मोठा विश्वास दाखवला होता.

भाजपकडून विधानपरिषदेची यादी जाहीर -

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठीची ५ नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपमध्ये विधानपरिषदेसाठी अनेकजण इच्छुक होते. पण अखेर भाजपाने बीड लोकसभा मतदारसंघाच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. भाजपने नुकतंच एक परिपत्रक काढत या पाच नेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com