Nana Patole On Operation Sindoor : दहशतवाद्यांच्या पहलगाम हल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट केले. मात्र, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी या मुलाखतीमध्ये हल्ल्याच्या एकतास आधी आम्ही पाकिस्तानला हल्ल्याची कल्पना दिली होती, असे वक्तव्य केले. त्यावरून त्यांना काँग्रेसकडून टार्गेट करण्यात येत आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जयशंकर यांच्यावर टीका करताना ऑपरेशन सिंदूरबाबत वादग्रस्त वक्तव्य केले.
नाना पटोले म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकावल्यामुळे युद्धविराम झाला. 'ट्रम्प यांनी एकदा दोना नव्हे तर बारावेळा हे सांगितले आहे. ट्रम्प यांच्या इशाऱ्याने ऑपरेशन सिंदूर रोखेल गेले. ऑपरेशन सिंदूर आधी आपल्या विदेशी मंत्र्यांनी पाकिस्तानाला सांगितले की की तुमच्या लोकांना हटवा. म्हणजे काॅम्युटरम्ये छोटी मुले जो गेम खेळतात तो गेम खेळला गेला.'
नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवट टीका केली आहे. ते म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही?
नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे!, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
पाकिस्तानला एक तास आधी आपण हल्ल्याविषयी सांगितले होते असे पराराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जयशंकर यांना टार्गेट करत आहेत.जयशंकर हे मोठी माहिती देशापासून लपवत आहेत. जर त्यांनी पाकिस्तानला आधीच हल्लाची माहिती दिली होती तर मग भारताचे कोणते विमान पाकिस्तानने पाठले याची देखील त्यांनी माहिती द्यावी. भारताला या युद्धात जयशंकर यांनी दिलेल्या माहितीमुळे नुकसान झाल्याचे देखील राहुल गांधी म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.