Nana Patole holds up pen drive in Maharashtra Assembly sarkarnama
महाराष्ट्र

Honeytrap Case : महाराष्ट्रातले मोठे मंत्री, अधिकारी हनी ट्रॅपमध्ये; नाना पटोलेंनी विधानसभेत पेनड्राईव्हच दाखवला!

Honeytrap Case Nana Patole Shows Pen Drive : नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण गंभीर आहे, असे आमदार जयंत पाटील म्हणाले. त्यांनी यासारख्या गंभीर मुद्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी निवेदन करायला हवे, अशी मागणी केली.

Roshan More

Nana Patole News : महाराष्ट्रतले मंत्री, मोठे अधिकारी हे हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत, असे नाना पटोले यांनी विधानसभेत बुधवारी सांगितले होते. आज (गुरुवारी) सभागृहात मुंबई मंत्रालय, ठाणे, नाशिक हानी ट्रॅपचे केंद्र बनली आहेत, असे म्हणत पटोलेंनी आपल्याकडे असलेला हातवर करून दाखवला. माझ्याकडे माझ्याकडे पेन ड्रायईव्ह देखील आहे. सरकारचे मत असेल तरी आम्ही तो दाखवूही शकतो, असे पटोले यांनी म्हटले.

'हानी ट्रॅपच्या माध्यमातून राज्याची महत्त्वाची कागदपत्रं अँटी सोशल मूव्हमेंटच्या हातात चालाली आहेत. मला कोणाचे चरित्र हनन करायचे नाही.मात्र, याबाबत सरकार गंभीर नाही. साधे निवेदन करायला तयार नाही. अध्यक्षांनी याबाबत निर्देश द्यावेत.' असे पटोले म्हणाले.

नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण गंभीर आहे, असे आमदार जयंत पाटील म्हणाले. त्यांनी यासारख्या गंभीर मुद्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी निवेदन करायला हवे, अशी मागणी केली. तर, याची दखल घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

भास्कर जाधवांचा गृहराज्यमंत्र्यांवर आक्षेप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकरणावर सभागृहात बोलताना गृहज्यमंत्री यांनी मीडियासमोर विधाने करताना नाशिकच्या माणसाने दिलेली तक्रार मागे घेतली आहे, असे म्हटले. त्यामुळे ते सभागृहाची दिशाभूल करत नाही ना याची विचारणा केली. त्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जी तक्रार मागे घेण्यात आली ती परस्पर संमतीने मागे घेतल्याचे म्हटले, तसेच केस दिली ती हनी ट्रॅपची नव्हती,असे देखील सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT