
Government Report Reveals : बेंगलुरू येथील चिन्नास्वामी स्टेडिअमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. कर्नाटक सरकारने हायकोर्टात सादर केलेल्या अहवालामध्ये स्टार क्रिकेटपटू व रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू संघाचा सदस्य विराट कोहलीवरही ठपका ठेवण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीमध्ये 11 किक्रेट चाहत्यांचा बळी गेला होता. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले होते.
मागील महिन्यात आयपीएलचे विजेतेपद मिळाल्यानंतर बेंगलुरू संघाकडून 4 जूनला विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली होती. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने समितीने नेमली होती. तसेच हायकोर्टानेही याची दखल घेत सर्व यंत्रणांना धारेवर धरले होते.
हायकोर्टात सादर करण्यात आलेल्या समितीच्या अहवालात म्हटले आहे की, आरसीबीने पोलिसांची परवानगी किंवा सल्ल्याशिवाय विजयी रॅलीसाठी लोकांना आमंत्रित केले होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली. आरसीबीने 3 जूनला सोशल मीडियात एक पोस्ट करत स्टेडिअममध्ये मोफत प्रवेश आणि विजयी रॅलीची घोषणा केली होती. ही रॅली विधानभवन पासून सुरू होत स्टेडिअममध्ये संपणार होती.
आरसीबीने ही घोषणा पोलिसांच्या परवानगीशिवाय केली होती. कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने 3 जूनला सायंकाळी 6.30 वाजता पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पण अपेक्षित गर्दी, व्यवस्था आणि संभाव्य धोक्याची माहिती नसल्याने पोलिसांनी परवानगी दिली नाही. पण त्यानंतरही आरसीबीने रॅलीचे नियोजन केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
समितीने आपल्या अहवालात विराट कोहलीच्या एका व्हिडीओचाही संदर्भ दिला आहे. त्यामुळे विरोट कोहलीकडून चाहत्यांना रॅलीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. अहवालामध्ये चेंगराचेंगरीसाठी थेट विराट कोहलीला जबाबदार धरण्यात आले नसले तरी व्हिडीओचा उल्लेख करण्यात आला आहे.
समितीच्या अहवालामध्ये कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, आरसीबी, इव्हेंट मॅनेजर डीएनए एंटरटेनमेंट आणि बेंगलुरू पोलिसांवर थेट ठपका ठेवण्यात आला आहे. आयोजकांनी स्टेडिअमचे गेट वेळेत आणि समन्वयाने उघडले नाही. त्यामुळे जमावाने गेट तोडले. स्टेडिअमच्या 9 प्रवेशद्वारांवर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.