Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News : विखे पाटलांचा फोन, पण जरांगेंचा प्लॅन ठरला; नारायणगडावरून केली मोठी घोषणा...

Manoj Jarange Patil’s ultimatum to Maharashtra Government : एकसारखे आडनाव असेल तर त्याला फोन करा. आडनाव सारखे असणारे तुमची भावकी, तुमचे नातेसंबंध, कुळ एक आहे. कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेत अर्ज करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना केले.

Rajanand More

Deadline till Diwali for Maratha reservation decision : नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून आपली भूमिका स्पष्ट केली. काही नेत्यांकडून हैदराबाद गॅझेटला होत असलेल्या विरोधावरून त्यांनी जोरदार हल्लाबोल करत इशाराही दिला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे.

मुंबईतील उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीरआर काढला होता. त्यानुसार प्रमाणपत्र देण्यास सुरूवात झाली आहे. त्याचप्रमाणे सातारा गॅझेटही लागू करण्याचे सरकारने मुंबईत मान्य केले होते. आज जरांगे पाटील यांनी साताऱ्यासह औंध, पुणे आणि कोल्हापूर संस्थानचे गॅझेट लागू करण्याचेही सरकारने मान्य केल्याचे सांगितले.

जीआरप्रमाणे कुणबी प्रमाणपत्रे न मिळाल्यास किंवा गॅझेटप्रमाणे ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता. त्याची घोषणा दसरा मेळाव्यातून होण्याची शक्यता होती. यापार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलन करू नये, यासाठी जरांगेंना फोन केला होता. जरांगेंनीच याचा खुलासा केला.

याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील यांचा सात-आठ दिवसांपूर्वी फोन आला होता. अतिवृष्टी झाल्याने थोडे थांबा. जीआर, गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे आता 15 दिवस ते एक महिना थांबू. दिवाळी होईपर्यंत वाट बघू, असे जरांगे पाटील म्हणाले.

दिवाळी संपेपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याची घोषणाही जरांगे पाटील यांनी केली. सरकारचे (सत्ताधारी पक्षांचे) एकही सीट जिल्हा परिषदेला निवडून द्यायचे नाही, असे आवाहन जरांगे पाटील यांनी उपस्थितांना केले. त्यामुळे आता जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढवले आहे.

एकसारखे आडनाव असेल तर त्याला फोन करा. आडनाव सारखे असणारे तुमची भावकी, तुमचे नातेसंबंध, कुळ एक आहे. कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेत अर्ज करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी उपस्थितांना केले. दिवाळीपर्यंत सर्वांना कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा, असे जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT