Manoj Jarange: मी थोड्या दिवसांचा पाहुणा...!नारायण गडावर मनोज जरांगे भावनिक

Narayan Gad Dasara Melava Live Manoj Jarange Patil speech: समाधानी राहा उताळू होऊ नका, समाज बुडेल असं वागू नका, स्वाभीमान जागा ठेवा, आपल्याला गुलाम म्हणणाऱ्यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil: नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा झाला. जरांगे यांनी आपल्या भाषणात ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. प्रकृती बरी नसल्याने जरांगे हे रुग्णालयातून ॲम्बुलन्स मधून आले होते. यावेळी त्यांनी समाज बांधवाशी संवाद साधताना ते भावनिक झाले.

जीवनात येऊन जे मिळवायचं होते ते मी मिळवलं आहे. माझे शरीर मला साथ देत नाही. मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. पण मला चिंता करण्याची गरज नाही, असे जरांगे म्हणाले. मी जिवंत असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देताना आपल्याला पाहायचे होते. ते स्वप्न आपण मुंबईत जीआर हाती घेवून पूर्ण केलं आहे. त्याचे आपल्याला समाधान असल्याचं ते यावेळी म्हणाले. दोन वर्षा संपूर्ण गरिब मराठा समाजाला आपण आरक्षणात टाकलं आहे असं ही ते यावेळी ते म्हणाले. आरक्षण देताना जातीचा अपमान केला तर मरेपर्यंत झटका द्यायचा, अशी सूचना जरांगे यांनी उपस्थितांना दिल्या.

समाधानी राहा उताळू होऊ नका, समाज बुडेल असं वागू नका, स्वाभीमान जागा ठेवा, आपल्याला गुलाम म्हणणाऱ्यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्याला गुलाम म्हणणाऱ्यांना आपण तीस वर्ष निवडणूक कसे दिले, असे म्हणाले. याचा रोख कुणाकडे होतो, याची चर्चा सुरु झाली आहे. प्रशासनात अनेक जणांनी बोगस आरक्षण घेतले आहे, असा आरोप त्यांनी यावेळी दिला. आमचं गॅझेट गुलामीची आहे का? असा सवाल त्यांनी केला.

Manoj Jarange
RSS 100 Years: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी! सहा सरसंघचालकांचे योगदान

सर्वंच ओबीसी बांधवाना दोष देऊ नका, सगळे ओबीसी आपल्या विरोधात नाही, मला नीट होऊ द्या,मग मी छगन भुजबळांना पाण्यात बघतो, असा इशारा त्यांनी दिला. अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आल्यामुळे सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करा, असे ते म्हणाले.शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली.

Manoj Jarange
Central Government: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महिन्याच्या पगाराएवढा मिळणार बोनस,"तुम्ही पात्र आहात का? आत्ताच तपासा

नारायण गड (जिल्हा बीड) हे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. मराठा समाजात हा गड श्रद्धेचे आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. दसऱ्याच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांनी इथे मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा मेळावा फक्त धार्मिक नाही तर सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरला.

काय म्हणाले जरांगे पाटील

  1. मी लढणारा आहे. समाज लढणारा आहे. मी गद्दारी केली नाही. तुमच्याशी गद्दारी करून मोठा झालो असतो पण ते आपल्या रक्तात नाही.

  2. गरिब मराठा समाज होरपळताना बघवत नव्हता. मी कधी नाटक केलं नाही. मी समाजाला कधी खोटं बोललो नाही. समाज तडफडत आहे हे मी पाहात होतो.

  3. लेकीबाळीचं दुख पाहवत नव्हतं. सहा कोटी मराठे आता सुखी राहीले पाहीजेत असं आपल्याला वाटत होतं. कधी शांत बसलो नाही. आरक्षण मिळवलच आहे.

  4. आपलं रक्त भेसळ नाही. काही जणांनी फक्त पांढरे कपडे घातले. गाड्यामध्ये फरले. यातच त्यांनी मोठेपण गाजवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com