Sanjay Raut on Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थकलेले आहेत. त्यांची प्रकृती बरी नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या दाव्यासोबत राष्ट्रीय स्वंयसेवक संघामध्ये देशाच्या नेतृत्वबदलाबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, 'मोदींची प्रकृती बरी नाही, असं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर दिसतय. ते अस्वस्थ आहेत, मी त्यांना ऑब्जर्व करतो. त्यांना बोलताना,चालताना, गाडीत बसताना. त्यांचेच लोकं सांगतात जसे नेहरु थकले होते तसे मोदी थकलेत. शेवटच्या काळात नेहरु फार थकले होते आणि आता मोदी फार थकलेत. आणि इतक्या थकलेल्या माणसाने देशाचे नेतृत्व करू नये.',
'राष्ट्रहितासाठी मोदी आणि शहांनी दूर व्हायला पाहिजे. राष्ट्रप्रथम असेल तर त्यांनी सत्तेपासून दूर जायला पाहिजे, मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायला पाहिजे. यालाच देशसेवा म्हणतात ना? कुवत नसताना, शरीर साथ देत नसताना सत्तेच्या खुर्चीत बसून देशाचे नेतृत्व करणं, यात राष्ट्रहीत नाही.', असा टोला देखील त्यांनी मोदींना लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले, 'आपण पाहिलं असेल की आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची कशी खिल्ल उठवली जाते. अमेरिकेचे राजदूत सांगतात की, मोदी कसे गयावया करतात, पत्रकार परिषदा घेऊ नका, मला प्रश्न विचारायला लावू नका, असे सांगतात. हे चांगल्या उत्तम आरोग्याचं, प्रकृतीचं लक्षण नाही. त्यांनी (मोदींनी) आत्मविश्वास गमावला आहे, त्याचा हा परिणाम आहे.'
मोदींनी देशासाठी वाहून घेतले आहे. ते झोपत देखील नाही, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जातो. त्याची देखील राऊतांनी खिल्ली उठवली. ते म्हणाले की, 'झोप न येणं हे देखील गंभीर आजाराचं, प्रकृती बिघाडल्याचं लक्षण आहे. मानसिकस्वस्थ ठीक नाही, चिंतेमुळे त्यांना झोप लागत नाही, हे सुद्धा त्यांचे आरोग्यबिघाडल्याचे लक्षण आहे.'
'मोदींना जबरदस्तीने लादलं जातंय. त्यांच्याकडे जे बाकी चेहरे आहेत ते विद्रुप आहेत. अमित शाहांना कोणी पंतप्रधान करणार नाही. शाहांनी किती कारस्थान केली, किती पक्ष फोडले, किती खासदार फोडले तरी त्यांना कोणी देशाचे पंतप्रधान होऊ देणार नाही. माझ्या माहिती प्रमाणे संघामध्ये (RSS) देशाच्या नेतृत्वबदलाबाबत चर्चा सुरू आहे.', असा दावा देखील राऊत यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.