Municipal Corporation news : महापालिकेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसमोर नगरसेवक हमरीतुमरीवर; गोंधळ पाहून मुलं झाली कावरीबावरी...

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation,corporators ruckus, school students visit : महापालिकेच्या सभागृहातील आरडाओरड, आरोप-प्रत्यारोप आणि महापौरांच्या आसनासमोरील गोंधळाने विद्यार्थ्यांचा उत्साह चक्क भीतीत बदलला; तंबीनंतरच नगरसेवक भानावर.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Chhatrapati Sambhajinagar Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शहराचा कारभार हाकणारे नगरसेवक महापालिकेत प्रत्यक्षात कसे काम करतात? हे पाहण्यासाठी शाळेचे काही विद्यार्थी सर्वसाधारण सभेच्यावेळी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. पण नगरसेवकांना त्याचे काहीच सोयरसुतक नव्हते. त्यांचा नेहमीप्रमाणे सभागृहात गोंधळ सुरू होता. महापौरांच्या आसनासमोर जाऊन आरडाओरड, कागद दाखवून तावातावणे बोलणे हे चित्र पाहून उत्साहाने आलेली मुलं अक्षरशः घाबरून गेली.

विद्यार्थ्यांसमोरच आपले नगरसेवक गोंधळ घालवत आहेत, हे महापौरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विद्यार्थी आपले कामकाज पाहण्यासाठी आलेले आहेत, याचे भान ठेवा, अशा शब्दांत कान टोचले. त्यानंतर कुठे नगरसेवक भानावर आले आणि सभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोणत्या विषयावरून वादाचा भडका उडेल याचा नेम नसतो. मंगळवारी (ता. २५) सर्वसाधारण सभेचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थी नगरसेवकांचा गोंधळ पाहून गोंधळून गेले होते.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज पाहण्यासाठी हर्सूल येथील संस्कृती ग्लोबल शाळेचे विद्यार्थी आले होते. पत्रकार कक्षातून हे विद्यार्थी कामकाज पाहत असताना सभेचे कामकाजच गोंधळात सुरू झाले. चर्चा घ्यायची की विषय पत्रिकेवर चर्चा करायची? यावरून एमआयएम नगरसेवकांनी आक्षेप घेतला.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Maharashtra IPS Officers : महाराष्ट्राला मिळाले 12 नवे IPS अधिकारी; उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती

सर्वसाधारण सभा प्रत्येक महिन्याच्या एक ते २० तारखेपर्यंत घेणे बंधनकारक असताना ती वेळेत घेतली जात नाही? नगरसेवकांना समोरे जाण्याची तुमची हिम्मत नाही का? अशा तिखट शब्दात विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी महापौरांवर हल्लाबोल केला. त्यावर सत्ताधारी पक्षातील नगरसेवक आक्रमक झाले.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
तब्बल अर्धा कोटी फॉलोअर्स, पण तुकाराम मुंढे सोशल मीडियात एकाच नेत्याला करतात फॉलो...

दोन्ही कडील नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर आले. हा गोंधळ पाहून विद्यार्थ्यांची चलबिचल सुरू झाली. ही चलबिचल महापौर समीर राजूरकर यांनी हेरली. त्यांनी शाळेचे विद्यार्थी कामकाज पाहण्यासाठी आलेले आहेत, त्याचे तरी भान ठेवा, अशा शब्दांत नगरसेवकांनी तंबी दिली. त्यानंतर कामकाज सुरळीत झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com