Mumbai News : राज्याच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून पक्ष फोडण्याची स्पर्धा सुरु आहे. जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा 40 आमदार फोडले. त्यानंतर दोन महिन्यातच 13 खासदार फोडले. तर त्यानंतर वर्षभरातच जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. 40 आमदार सोबत घेत ते महायुतीमध्ये सहभागी झाले. या घटना ताज्या असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा जून 2026 मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले.
गेल्या चार वर्षांत अनेक नेत्यांना प्रवेश दिले दोन दिवसापूवीच शिंदेंच्या शिवसेनेने भुसावळमधील शरद पवार पक्षाचे 11 नगरसेवक फोडले. आता ठाकरेंचे आमदार देखील फुटणार असल्याची चर्चा केली जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत आता कोणीच शिल्लक राहणार नाही. येत्या काही दिवसांत सर्व कळेल, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे नेते, खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
ठाण्यातील दहीहंडींना खासदार नरेश म्हस्के भेटी देत आहेत. संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीला त्यांनी उपस्थिती दर्शवली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार म्हस्के म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वीच राजकीय हंडी ही फोडली. त्यांनी दाखवून दिले की, ठाण्याचा एकनाथ शिंदे हंडी फोडू शकतो. येत्या काळातही फोडाफोडी लवकरच कळेल. ठाकरेंच्या शिवसेनेत कोणीच शिल्लक राहणार नाही. ठराविक दोन-व्यक्ती सोडल्यावर, कोणीच शिल्लक राहणार नाही’.
तुरुंगात विष प्रयोग झाल्याचा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यावरून म्हस्के म्हणाले, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत. सतत प्रसिद्धीत राहण्यासाठी अशी वक्तव्ये करत असतात. ते उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर चढून हंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रसिद्धी माध्यमात राहण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत.
ठाण्यातील रामनगरच्या पथकाने 9 थर लावले आहेत. ठाणेकरांनी हा विक्रम केला आहे. संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीचं आयोजन हे रविंद्र पाठक यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. दहीहंडीची पंढरी ठाण्याला म्हटले जाते. संपूर्ण ठाण्याचे वातावरण दहीहंडीमय झाले आहे, असेही यावेळी म्हस्के यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.