Parbhani Politics : खासदार जाधवांचा ठाकरेंना सर्वात मोठा धक्का? 'ते' 18 नगरसेवक शिंदेसेनेत जाणार, थेट महापालिकेतील सत्ता समीकरणच बदलणार?

Shivsena Parbhani political crisis : सध्या परभणी महापालिकेत उबाठाचे २५ नगरसेवक आहेत. त्यापैकी १८ नगरसेवकांनी वेगळी वाट धरल्यास हा केवळ पक्षबदल न राहता उबाठाच्या महापालिकेतील राजकीय ताकदीवरच घाला ठरणार आहे.
parbhani municipal corporation; uddhav thackeray and DCM eknath shinde
parbhani municipal corporation; uddhav thackeray and DCM eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Parbhani News, 27 Aug : उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवून परभणीचे खासदार संजय जाधव यांची शिकार केली. त्यानंतर येत्या ३० ऑगस्टला परभणीत होऊ घातलेल्या शेतकरी मेळाव्यात संजय जाधव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहेत.

जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आली. जाधव यांच्या पक्षांतरानंतर आता महापालिकेतील ठाकरेंच्या सत्तेला हादरा देण्याची तयारी त्यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तब्बल १८ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

परभणीतील शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने संजय जाधव हे जोरदार शक्तीप्रदर्शन तर करणार आहेतच, पण या शिवाय महापालिकेची सत्ताही शिंदे यांना सरप्राईज गिफ्ट म्हणून देतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परभणी महापालिकेच्या राजकारणात येत्या दोन दिवसांत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल १८ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाल्याने महापालिकेती राजकारण चांगलेच तापले आहे.

सध्या परभणी महापालिकेत उबाठाचे २५ नगरसेवक आहेत. त्यापैकी १८ नगरसेवकांनी वेगळी वाट धरल्यास हा केवळ पक्षबदल न राहता उबाठाच्या महापालिकेतील राजकीय ताकदीवरच घाला ठरणार आहे. त्यामुळे शहरात सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे. तो म्हणजे १८ जण खरंच निघणार की ही केवळ राजकीय दबावतंत्रासाठीची ही खेळी आहे? हे लवकरच स्पष्ट होईल.

या चर्चेला पार्श्वभूमी आहे ती महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाची. गेल्या १५ ते १८ दिवसांपासून कर्मचारी संपावर असून, वाढीव जीएसटी अनुदान आणि थकीत पगार या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेत सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, खासदारांच्या या भेटीचे राजकीय पडसादही उमटले. भेटीच्या वेळी महापौर सय्यद इकबाल यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नगरसेवकांची खासदारांच्या अवती-भवती उपस्थिती होती. त्यामुळे ही भेट केवळ संपकरी कर्मचाऱ्यांची विचारपूस करण्यासाठी होती की त्यामागे महापालिकेतील राजकीय समीकरणांचीही काही गणिते दडली होती? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सध्या काँग्रेसच्या मदतीने ठाकरेंच्या शिवसेनेची महापालिकेत सत्ता आहे. त्यामुळे १८ नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडली तर विद्यमान सत्तासमीकरणावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. काँग्रेसची भूमिका काय राहणार, ठाकरेंचे नेतृत्व या संभाव्य फुटीला कसे रोखणार? आणि शिंदेसेना या कथित ऑपरेशन मागे कितपत सक्रिय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

parbhani municipal corporation; uddhav thackeray and DCM eknath shinde
Document registration : दस्त नोंदणीसाठी आता कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही; दुय्यम निबंधक थेट तुमच्या घरी येणार!

दरम्यान, १८ नगरसेवक शिंदेसेनेच्या संपर्कात या चर्चेने ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या गोटात मात्र या संभाव्य प्रवेशाबाबत कमालीची शांतता असल्याचे चित्र आहे. राजकारणात अशी शांतता अनेकदा वादळापूर्वीची असते, अशी मिश्कील चर्चा समर्थकांमध्ये रंगली आहे.

खिंडार पडणार की डॅमेज कंट्रोल?

आता खरा प्रश्न आहे तो १८ चा आकडा प्रत्यक्षात उतरतो का? कारण हा आकडा जर खरा ठरला, तर परभणी महापालिकेच्या राजकारणात केवळ पक्षफुटी होणार नाही, तर सत्तेची समीकरणेही बदलतील. त्यामुळे येणारे दोन दिवस परभणी महापालिकेसाठी कमालीचे महत्त्वाचे ठरणार आहेत. चर्चेचे १८ प्रत्यक्षात किती उतरतात, यावरच महापालिकेच्या राजकारणाचा पुढचा अंक रंगणार आहे. तोपर्यंत शहराच्या राजकीय कट्ट्यावर एकच चर्चा ठाकरेंच्या घरात खिंडार पडणार की शेवटच्या क्षणी डॅमेज कंट्रोल होणार? याचीच होताना दिसते आहे.

parbhani municipal corporation; uddhav thackeray and DCM eknath shinde
MPSC Paper Leak : प्रेयसीला धडा शिकवायला गेला अन् स्वत:च जाळ्यात अडकला; प्रियकरामुळे असा झाला MPSC पेपरफुटीचा भांडाफोड

खासदारांकडून संकेत..

महापालिकेतील सत्ताधारी ठाकरेंच्या शिवसेनेच्या १८ नगरसेवकांच्या कथित पक्षफुटीच्या चर्चेला आता थेट खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्याने उधाण आले आहे. खासदारांच्या मागे-पुढे फिरणारे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जाधव यांना थेट विचारण्यात आली. त्यावर त्यांनी, येत्या दोन दिवसांत काहीही होऊ शकते असे सूचक उत्तर दिले.

विशेष म्हणजे, खासदार एवढ्यावरच थांबले नाहीत. बोलता बोलता त्यांनी १८ हा आकडाही उच्चारला, त्यामुळे आधी केवळ राजकीय वर्तुळातील कुजबुज असलेली चर्चा आता आणखीच पेटली आहे. काहीही होऊ शकते याचा नेमका अर्थ काय आणि तो १८ नगरसेवकांशीच संबंधित आहे का? याचे उत्तर आता पुढील दोन दिवसांत मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com