Ajit Pawar And Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

NCP vs NCP battle : घड्याळ अजितदादांचे की शरद पवारांचे? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कॉन्फिडन्स भलताच; म्हणे, 'ते आमचचं राहणार'

Narhari Zirwal On NCP Party Symbol : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह हिरावलं गेलं आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून घड्याळावर दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात येत आहे.

Aslam Shanedivan

Bhandara News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड करत मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. त्यांनी 40 आमदार आपल्याबरोबर घेत वेगळी चूल मांडली. तसेच पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह देखील शरद पवार यांच्याकडून हिरावून घेतलं. यानंतर शरद पवार यांच्या गटाने याची आधी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. पण आयोगाने पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले. यानंतर शरद पवार यांच्या गटाने याची दाद सर्वोच्च न्यायालयात मागितली आहे. सध्या प्रकरणाची सुनावणी सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वारंवार केला जातोय. अशातच आता भंडाऱ्यात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड यांनी आपला कॉन्फिडन्स दाखवला आहे. त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाचेच राहील अशा विश्वास दाखवला आहे. याच कॉन्फिडन्सची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे.

झिरवाड यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ या चिन्हाच्या बाबत आपली प्रतिक्रीया दिली. यावेळी ते म्हणाले, मी कसा सांगेन की घड्याळ चिन्ह आमचं राहणार नाही? ते आमचंच आहे. ते आमच्या अजित पवार गटाचंच असून ते आमच्याकडेच राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

तसेच यावेळी झिरवाळ यांनी, वाल्मिक कराड याला पोलीस कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या विरोधकांच्या टीकेच्या आरोपाला उत्तर दिले. त्यांनी, विरोधकांच्या टीकेची हवा काढताना, विरोधकांकडून आरोपच होत नसतील तर ते विरोधक कसले? सरकारकडून काही चुकीचं होत असेल तर त्यावर अंकुश ठेवण्याचे काम विरोधकांचे असते.

फक्त वाल्मिक कराडवरून धनंजय मुंडेंवर आरोप केले जात आहेत. फक्त त्यांचा, राजीनामा घ्या, इतकीच मागणी करत आहेत. मात्र मुंडे यांनी याआधीच स्पष्ट केले आहे की, आपण दोषी असू तर राजीनामाचं काय तर फासावर जाईल. पण विरोधकांचं काय तर, राजीनामा द्या राजीनामा द्या.

कृषिमंत्री कोकाटे यांचाही 25 वर्षांपूर्वीचा फ्लॅटचा विषय आहे. एवढे दिवस ते आमदार होतेच की, आता ते मंत्री झाल्याबरोबर त्यांच्यावर आरोप होत आहेत. विरोधकांनी कामकाजात होत असलेल्या त्रुटीबाबत, काही चुकीचं होत असेल त्याबाबत बोलावं. पण विरोधकांचं आता घरगुती भांडणासारखं चालू झालय. याला काही अर्थ नसल्याचा टोलाही झिरवाड यांनी विरोधकांच्या भूमिकेवर लगावलाय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT