Milk adulteration news: दूध हे पूर्णान्न मानले जाते. मात्र त्यात अतिशय गंभीर भेसळ होत आहे. त्यात अनेक मोठ्या संस्थाच सहभागी असल्याचा संशय आहे. त्यात आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनीच लक्ष घातले आहे.
दुधात होणारी भेसळ हा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. यासंदर्भात अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रशासन आणि दूध पुरवठादारांना मोठा धक्का दिला. मंत्री स्वतःच भल्या पहाटे चारलाच मुंबईच्या वेशीवर पोहोचले. त्यांनी दुधाचे टँकर तपासले. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी शासनाला आहे, असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
याबाबत अन्न व औषध पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ स्वतः मैदानात उतरले आहेत. मंत्री झिरवाळ काल पहाटे चार लाख घरातून बाहेर पडले. त्यांनी मुंबईच्या सीमेवरील मानखुर्द, मुलुंड चेक नाका, वाशीच चेक नाका, दहिसर, ऐरोली येथे रस्त्यावर उतरून वीस ते पंचवीस दुधाचे टँकर तपासले.
स्वतः मंत्रीच पहाटे चारला चेक नाक्यावर तपासणी करीत असल्याचे समजताच प्रशासनात खळबळ उडाली. यावेळी झिरवाळ यांनी या टँकर चालकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करीत कर्मचाऱ्यांना दुधाचे नमुने घेण्यास सांगितले. मुंबईत प्रवेश होणाऱ्या ठिकाणांवर चार ते पाच ठिकाणी त्यांनी हा प्रयोग केला. त्यामुळे दूध उत्पादक आणि वितरण करणाऱ्या संस्थांचे धाबे दणाणले.
मुंबई शहराला मोठ्या प्रमाणावर दुधाची गरज असते. यासंदर्भात विविध मोठ्या संस्था दूध पुरवठा करतात. मात्र त्यांच्याकडे उपलब्ध असलेली दुधाची यंत्रणा आणि प्रत्यक्ष पुरवठा होणाऱ्या दुधामध्ये मोठी तफावत असल्याच्या तक्रारी खुद्द मंत्रांकडे करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत मुंबईकरांचे आरोग्य जपण्यासाठी झिरवाळ यांनी हा प्रयोग केला.
यावेळी केलेल्या तपासणी आणि तज्ञांची केलेल्या चर्चेतून दुधामध्ये विविध प्रकारची भेसळ होत असल्याचे बोलले जाते. स्टार्च, डिटर्जंट, सोडियम क्लोराईड, साखर, ग्लुकोज, हायड्रोजन, पेरॉक्साईड, बायोकार्बोनेट, मेलामाईन, सरबीटोल, एसएमपी, मार्टोज आदी आरोग्याला घातक पदार्थ दुधात भेसळीसाठी वापरले जातात. त्याचा दुधाच्या गुणवत्तेवर आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे राज्य शासनाने हा विषय असा गांभीर्याने घेतला आहे.
सध्याच्या रचनेनुसार वीस कोटीहून अधिक उलाढाल असलेल्या संस्थांची तपासणी केंद्र शासन करते. त्यामुळे या संस्थांच्या तपासणीत व प्रक्रिया केंद्रांना भेटी देण्याचे अधिकार राज्य शासनाच्या यंत्रणेला नाहीत. याचा गैरफायदा अनेक मोठे पुरवठादार घेत असल्याचा संशय आहे. या संदर्भात मंत्री झिरवाळ केंद्र शासनाची पत्रव्यवहार करून राज्य शासनाला हे अधिकार मिळावेत. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.