Narhari Zirwal  Sarkarnama
महाराष्ट्र

Narhari Zirwal : लाच प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत, धक्कादायक माहिती समोर; सकाळपासून नाॅट रिचेबल!

Narhari Zirwal Bribery Case : एसबीने अटक केलेल्या अन्न व औषध प्रशानातील कर्मचाऱ्याचे नाव राजेंद्र ढेरंगे असे आहे. त्याने दिलेल्या माहितीमुळे मंत्री झिरवळ यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

Roshan More

Narhari Zirwal News : मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात 35 हजारांची लाच घेताना लिपीकाला एसबीने रंगहात पकडले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मंत्र्याच्या दालनात हे प्रकरण घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंत्री झिरवळ यांनी या प्रकरणाशी आपला संबंधन सल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांचा फोन आज सकाळपासून नॉटरिचेबल आहे.

लाच प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून तपासामध्ये अटक केलेल्या लिपीकाने मंत्री झिरवळांच्या खाजगी पीएने पैसे घेण्यास सांगितल्याचे कबुली दिल्याची माहिती आहे. त्यामुळे झिरवळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसबीने अटक केलेल्या अन्न व औषध प्रशानातील कर्मचाऱ्याचे नाव राजेंद्र ढेरंगे असे आहे. तो क्लार्क पदावर कार्यरत आहे. एका मेडिकलचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी त्याने 50 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील 35 हजाराची लाच घेताना तो रंगेहात सापडला.

...तर राजीनामा देईल

मंत्री नरहरी झिरवळ यांनी काल (शुक्रवारी) माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही. जर आपला संबंध यामध्ये असल्याचे सिद्ध झाले तर आपण राजीनामा देऊ. दरम्यान, या प्रकरणात आता झिरवळाच्या खासगी सचिवाचे नाव पुढे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT