Eknath Shinde, Amit Shah, Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut: एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून बळ; हा महाराष्ट्राच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांना इशाराच!

Nashik Legislative Council Election, Gokul Gite, Sanjay Raut:नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांच्या विजयावर संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपमधील अंतर्गत राजकारण आणि महायुतीतील मतभेदांमुळे हा निकाल लागल्याचा दावा त्यांनी केला.

Sampat Devgire

Nashik: नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते निवडून आले. माघार घेतलेल्या उमेदवाराला मते मिळालीच कशी? हा गंभीर विषय आहे. यामागे वेगळेच राजकारण घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. नाशिकच्या निवडणुकीत माघार घेतलेल्या गोकुळ गीते यांना शिवसेनेने मदत केली. त्या मतांचा गीते यांना विजयासाठी उपयोग झाला. मात्र या निवडणुकीत पडद्यामागून वेगळेच राजकारण घडले आहे. ते भाजप अंतर्गत घडामोडींचा भाग आहे, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला.

नाशिक विधानपरिषदेच्या मतदारांना ठाण्यात ठेवण्यात आले होते. असे असताना शिंदेंच्या उमेदवाराचा पराभव होतो. अपक्ष आणि माघार घ्यायला लावलेल्या गोकुळ गीते यांना मतदान होते. हे मतदान प्रमुख्याने भाजप आणि शिवसेनेचे आहे, हे उघड सत्य आहे. मतदार ठाण्यात ठेवलेले असताना गोकुळ गीते यांना मतदान होते. ते निवडून येतात. हा खरे तर आश्चर्य करणारा विषय आहे. ठाणे येथे ठेवलेले मतदार शिंदेंच्या मतदाराला मतदान करत नाहीत, याचा अर्थ बोलका आहे.

सध्या सर्व राजकारण भाजप अंतर्गत सुरू आहे. भाजप पक्षात घडणारे राजकारण महाराष्ट्राच्या दृष्टीने फारसे चांगले नाही. त्यातून जो संदेश जातो आहे तो महाराष्ट्राच्या राजकीय अस्थिरतेला कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील अमित शाह सेनेचे प्रमुख असा एकनाथ शिंदे यांचा राऊत यांनी उल्लेख केला. एकनाथ शिंदे यांना सध्या दिल्लीतून बळ देण्याचे काम सुरू आहे. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने फारशी चांगली लक्षणे नाहीत. त्यामुळेच एकनाथ शिंदे बाजूला असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खरे नसते, असा दावा राऊत यांनी केला.

गोकुळ गीते आमच्याकडे मदतीसाठी आले होते. त्यांना आम्ही मदत केली. गीते यांच्या विजयात शिवसेनेच्या वाटा आहे. मात्र त्यांना मिळालेली मते ही भाजप आणि शिवसेनेची आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. शिंदे यांच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी हे मतदान झाले, याचा अर्थ बोलका आहे असे राऊत म्हणाले.

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने राज्यभर राजकीय तरंग उमटले आहेत. हा भाजपच्या अंतर्गत सुरू असलेल्या राजकीय ओढाताण आणि वादाचा भाग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असल्याचे सूचक विधान देखील राऊत यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT