Congress News: नुकत्याच झालेल्या राजस्थान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. राज्यातील सत्ताधारी भाजपला मोठा सेटबॅक बसला. विशेष म्हणजे या निवडणुकीत नाशिकच्या एका युवतीने जोरदार मुसंडी मारली.
नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीचे संचालक महेंद्रपाल चौधरी यांची मुलगी मीनाक्षी सिंग यांनी राजस्थान पंचायत समितीच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. सिकर जिल्ह्यातील खंडेला पंचायत समिती निवडणुकीत त्या दणदणीत मतांनी विजयी झाल्या. काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती.
निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. खंडेला पंचायत समितीच्या निवडणुकीतही काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला.एवढेच नव्हे तर त्या पंचायत समितीच्या सभापती ही झाल्या आहेत.
मीनाक्षी सिंग मूळच्या नाशिकच्या आहेत. त्यांच्या वडिलांचे अर्थात महेंद्रपाल चौधरी हे कुटुंब टोंक (राजस्थान) येथून व्यवसाय निमित्त नाशिकला स्थायिक आहे. मीनाक्षी सिंग यांचे प्राथमिक आणि उच्च शिक्षण नाशिकलाच झाले आहे. 2013 मध्ये त्यांचा राजस्थानला विवाह होऊन त्या तेथे स्थायिक झाल्या.
राजस्थान येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री महादेव सिंग खंडेला यांचे चिरंजीव गिरीराज सिंग यांच्याशी मीनाक्षी यांचा विवाह झाला आहे. कुटुंबाला राजकीय वारसा असला तरीही मीनाक्षी सिंग यांनी स्थानिक पातळीवर जनतेत जाऊन काम करून आपली प्रतिमा आणि ओळख निर्माण केली. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला.
त्यांची ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत त्यांनी जोरदार प्रचार करून भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत केले. त्यानंतर पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांची एकमताने निवड झाली आहे. नाशिकला लहानच्या मोठ्या झालेल्या मीनाक्षी सिंग यांनी राजस्थानच्या राजकारणात आपला ठसा उमटविल्याने नाशिककरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.