BJP Politics : NCP आमदाराच्या बालेकिल्ल्यात भाजपची नवी खेळी; जुन्या जनत्या नेत्याकडे पुन्हा शहराध्यक्षपद

BJP Chiplun City President Ashish Khatu Appointment : भाजपच्या चिपळूण शहराध्यक्षपदी आशीष खातू यांची पुन्हा एकदा भाजपच्या चिपळूण शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
NCP MLA Shekhar Nikam
NCP MLA Shekhar NikamSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chiplun News : रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने पुन्हा एकदा राजकीय खेळी करत भाकरी न फिरवता जुन्या अनुभवी नेत्यावर विश्वास दाखवला आहे. भाजपचे शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी चिपळूण शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर माजी शहराध्यक्ष आशीष खातू यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.

या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या चिपळूण मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निकम यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे प्रशांत यादव यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर आता त्यांच्या राजकीय वाटचालीला पक्ष पातळीवरून बळ देण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे.

गेल्याच महिन्यात भाजपने चिपळूण शहर मंडळाच्या नेतृत्वात बदल करत माजी शहराध्यक्ष आशीष खातू यांच्याकडे पुन्हा शहराध्यक्षपदाची सूत्रे सोपवली होती. या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते, तर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता महिनाभराच्या कालावधीनंतर खातू यांच्याकडे पुन्हा शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

NCP MLA Shekhar Nikam
BJP Politics : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचे संकेत; रत्नागिरीत समीकरणे बदलण्याची शक्यता; भाजपमध्ये मोर्चेबांधणी वेग

त्याचबरोबर भाजपने ६८ सदस्यीय जंबो शहर कार्यकारिणी जाहीर केली असून, त्यामध्ये जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. शशिकांत मोदी यांच्याकडे नगर परिषद गटनेतेपदाची जबाबदारी असल्याने शहराध्यक्षपदासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याचे कारण देत त्यांनी पदभार अन्य पदाधिकाऱ्याकडे सोपवण्याची विनंती केली होती. भाजपच्या 'एक व्यक्ती, एक पद' या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाकडूनही सांगण्यात आले होते.

भाजपच्या चिपळूण शहर कार्यकारिणीत कुणाला संधी?

भाजपच्या नव्या शहर कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी निनाद आवटे, सुनील जांभेकर, महेश दीक्षित, दिनेश लटके, राकेश दाते आणि शमून घारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी विलास चव्हाण आणि कुणाल आंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. चिटणीसपदी प्रदीप शितप, जतिन घटे, अभिषेक राजापूरकर, फैजू दळवी, पूनम काजारी आणि नरेंद्र बेलवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शेखर लवेकर यांच्याकडे कोषाध्यक्षपद, तर अमित पाटणकर यांच्याकडे सोशल मीडिया प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय कार्यकारिणी सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

NCP MLA Shekhar Nikam
BJP Politics : भाजपला पराभवाची भीती? घेतला मोठा निर्णय; 'ते' मंत्री मैदानात उतरणार!

चिपळूणमध्ये भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आव्हान

शहरातील बूथ पातळीपर्यंत पक्षाचे विचार आणि कार्यक्रम पोहोचवणे, वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे आणि संघटनात्मक कामांना गती देणे, अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या शहर मंडळ अध्यक्षाकडे असतात. त्यामुळे माजी शहराध्यक्ष आशीष खातू यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण शहरातील भाजपची संघटनात्मक बांधणी कितपत मजबूत होते आणि आगामी राजकीय समीकरणांमध्ये पक्षाची ताकद कशी वाढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.