Balasaheb Thorat: नाशिक पुणे रेल्वे प्रश्नाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. तीस वर्ष या महत्त्वाच्या प्रश्नावर केंद्र सरकार चालढकल करीत आली आहे. त्यामुळे आता या प्रश्नावर सर्वच खासदार आक्रमक झाले आहेत.
नाशिक पुणे रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे. त्याच्या भूसंपादनासाठी प्रक्रिया करण्यात आली. मात्र अचानक नगरच्या एका सत्ताधारी मंत्र्याने त्यात राजकारण आणल्याने हा प्रश्न चिघळला आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या विषयावर केंद्र सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. नाशिक पुणे हा औद्योगिक आणि प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. त्यात कोणीही अडथळा आणू नये. रेल्वे मंत्रालयानेही नगर आणि शिर्डीचा स्वतंत्र विचार करावा. त्यासाठी नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पाला अडथळे आणू नये असा इशारा देण्यात आला आहे.
या प्रश्नाने सध्या पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. कार्यक्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांसह विविध नेत्यांनी या प्रश्नावर राज्य शासन आणि केंद्राला पत्र लिहून इशारा दिला आहे. या संदर्भात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली.
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत या विषयावर गेल्या दोन दिवसात तीन बैठका झाल्या आहेत. नाशिक रोड येथे शुक्रवारी बैठक झाली. सिन्नर येथे नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले, राजाराम मुरकुटे, प्रा राजाराम मुंगसे, आनंद मालमुठे, विजय दिघे यांसह कृती समितीच्या नेत्यांची बैठक झाली.
या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यामुळे या प्रश्नावर होणारे समृद्धी महामार्ग रोखण्याचे आंदोलन एक महिना पुढे ढकलण्यात आले आहे.
या प्रश्नावर महिनाभरात कार्यवाही न झाल्यास सिन्नर आणि नाशिक रोड येथे नागरिकांचे मेळावे घेण्यात येतील. त्यानंतर या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा भेटण्याचे चिन्ह आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.