Cloudburst update in Nashik today Sarkarnama
महाराष्ट्र

Nashik Rain: नाशिकवरील ढगफूटीबाबत मोठी अपडेट! ढग सुरत-अकोलेकडे सरकले; संकट टळले, सतर्कतेचे आवाहन

Nashik cloudburst threat latest news: नाशिकवरील संभाव्य ढगफुटीचा धोका सध्या टळला असून पावसाचा भोवरा सुरत आणि अकोलेच्या दिशेने सरकला. नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाचे आवाहन केले आहे.

Mangesh Mahale

4 संक्षिप्त पाईंटर्स

  • नाशिकवरील संभाव्य ढगफुटीचा धोका सध्या टळला.

  • पावसाचा भोवरा सुरत आणि अकोलेच्या दिशेने सरकला.

  • इगतपुरी-त्र्यंबकेश्वरसह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कायम.

  • नागरिकांनी सतर्क राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद.

Trimbakeshwar rain latest update: हवामान विभागाने आज नाशिकसाठी रेड अलर्ट दिला होता, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण होते, मात्र निसर्गाने नाशिककरांना मोठा दिलासा दिल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकवर ढगफुटी आणि महाप्रलयाचे टांगते मोठे संकट सध्या तरी तूर्तास टळले आहे. याबाबतच नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली आहे.

पालघर आणि त्र्यंबकेश्वर मार्गे नाशिकमध्ये येणारा 'पावसाचा भोवरा' आता सुरत आणि अकोले परिसराकडे सरकला आहे. याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली आहे.

सोमवारी पालघर जिल्ह्यात वाऱ्याच्या अनुकूल प्रवाहामुळे तब्बल ४५० मिमी पावसाची नोंद झाली होती. याच वाऱ्याच्या प्रवाहामुळे हे ढग पुढे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या दिशेने सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

मात्र, नंतर वाऱ्याची दिशा बदलल्याने हे धोकादायक पावसाचे ढग नाशिककडे न जाता अहिल्यानगर (अहमदनगर) आणि गुजरातमधील सुरतच्या दिशेने वळले. त्यामुळे नाशिकवरील अतिवृष्टी किंवा संभाव्य ढगफुटीचा धोका सध्या टळल्याची माहिती आयुष प्रसाद यांनी दिली.

रात्रीपासून इगतपुरी, पंचवटी, त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यावर अद्याप मुसळधार पाऊस सुरू असला, तरी एकूण परिस्थिती सध्या नियंत्रणात असून तुलनेने समाधानकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, मात्र घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT