Maval Landslide: मावळ हादरलं! दरडीखाली घर गाडल्याने शेतकरी कुटुंब संपलं, दांपत्यासह मुलाचा मृत्यू

Patan Village Landslide News:मावळ तालुक्यातील पाटण गावात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून घर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत शेतकरी दांपत्य आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला.
Patan Village Landslide News
Patan Village Landslide NewsSarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

  1. मावळच्या पाटण गावात घरावर दरड कोसळून तिघांचा मृत्यू

  2. मृतांमध्ये शेतकरी दांपत्य आणि त्यांच्या मुलाचा समावेश

  3. मुसळधार पावसामुळे पहाटेच्या सुमारास भीषण दुर्घटना

  4. एनडीआरएफ आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले

तळेगाव दाभाडे: मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील पाटण गावावर आज पहाटे काळाने घाला घातला. डोंगरकड्यावरून कोसळलेल्या प्रचंड दरडीखाली घर गाडले गेल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पहाटेच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग अचानक कोसळून थेट नंदू दत्तू तिकोणे यांच्या घरावर आला. या दुर्घटनेत नंदू दत्तू तिकोणे, अनिता नंदू तिकोणे आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर नंदू तिकोणे हे तिघेही ढिगाऱ्याखाली अडकले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महसूल विभाग, पोलीस, स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि स्वयंसेवकांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. जेसीबीसह विविध यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अनेक तास ढिगारा हटविण्याचे काम सुरू होते.

Patan Village Landslide News
Mumbai Rain News: मुंबईत रेड अलर्ट! सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, खासगी कंपन्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या संयुक्त प्रयत्नांतून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Patan Village Landslide News
Ketan Agrawal Case: लोहगडावर केतनची हत्या; नातवाच्या विरहानं आजोबांनीही सोडले प्राण, देवीचंद अग्रवाल यांचे निधन

सततच्या पावसामुळे मावळातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डोंगराच्या पायथ्याशी आणि दरडप्रवण भागात राहणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com