Nashik News : नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत गेले चार वर्ष महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार करत त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या संदर्भात आठ महिलांनी पुढे येऊन तक्रार केली आहे.
नाशिक पोलिस ठाण्यात महिलांचा विनयभंग, अत्याचार, मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखवल्याचे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या तपासा करता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बहुराष्ट्रीय कंपनीत दोन विवाहित महिलांसह सहा तरुणी अशा आठ जणींचे लैंगिक शोषण, विनयभंग करत त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. 2022 पासून हा प्रकार सुरू होता. यासंदर्भात नऊ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्येही एका युवकाच्या तक्रारीचा देखील समावेश आहे.
या प्रकरणी असिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, तौसिफ अत्तार, दानिश शेख, निदा खान यांच्यासह एक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांना टक केली असून दोन महिला फरार आहेत. अटक आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपयुक्त संदीप मिटके यांनी केला.
महिलांनी पुढे येऊन पोलिसांना तक्रार दिली. गेले अनेक दिवस या पीडित महिला एकत्र येऊन दाद मागण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यांनी धाडस करून पोलिसांना आपली आपबीती सांगितली. लैंगिक शोषण, अत्याचार, धर्मांतर करण्यासाठी मानिसक दबाव कशा प्रकारे टाकला जात होता हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
हिंदू धर्मातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या धर्मातील कुप्रथा, वाईट गोष्टी सातत्याने सांगून त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. कंपनीतील एका युवकावर दबाव टाकून त्याला धर्मांतरण करण्यास भाग पाडले. त्यांचे फोटे समोर आल्याने धर्मांतरणाची गोष्ट समोर आली. त्या तरुणाला आरोपींनी विशिष्ट पोशाख घालून धार्मिक चालिरिती पाळण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.