KDMC Blackmail Case : धक्कादायक! महिलेला ब्लॅकमेल करत शारीरिक संबंधांची मागणी, महापालिकेतील कर्मचाऱ्याचे कांड!

KDMC Police : महापालिकेतील वरिष्ठ लपिकाने महिलेला व्हाॅट्सअप काॅल करत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
KDMC
KDMCsarkarnama
Published on
Updated on

KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील एका वरिष्ठ लिपीकावर महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढण्याची धमकी देत शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित महिला कर्मचाऱ्याने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, भूषण पाटील (वरिष्ठ लिपीक) यांनी काही दिवसांपूर्वी सावळाराम क्रीडा संकुलात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याशी वाद घातला होता. कामाच्या कारणावरून झालेल्या या वादावेळी त्यांनी संबंधित महिलेला अपमानास्पद शब्दांत सुनावले. दरम्यान, सहकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद तात्पुरता मिटवला होता.

यानंतर काही दिवसांनी आरोपीने संबंधित महिलेला व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे संपर्क साधला. “वरिष्ठांकडून तुला कामावरून काढण्याचे आदेश आहेत, मात्र मी ते थांबवू शकतो,” असे सांगत त्याने तिला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याबदल्यात शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पीडित महिलेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने तिने अखेर मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी भूषण पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

KDMC
Kalpna Kharat: गुन्हा दाखल झाल्यानंतर अशोक खरातची पत्नी फरार! मुलगा ताब्यात; शोधासाठी दोन पथकं रवाना

महापालिकेकडून चौकशी सुरू

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी या घटनेची पुष्टी करत तपास सुरू असल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणात आणखी काही महिला कर्मचाऱ्यांनीही अशाच प्रकारचे आरोप केल्याची माहिती पुढे येत आहे.

दरम्यान, ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू असून अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

KDMC
Pune Crime : खरात प्रकरणानंतर नागरिक आक्रमक! बुवाबाजी करणाऱ्या भोंदूबाबाला चोप; महिलेची आर्थिक फसवणूक करणे पडले महाग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com