chandrakant Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Navi Mumbai politics : नवी मुंबईत पवारांना मोठा धक्का; शिंदेंनी बड्या नेत्याला लावलं गळाला

Chandrakant Patil joined Shiv Sena : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवी मुंबईतील बड्या नेत्याचा आणि त्यांचा मुलगाचा शिवसेनेत पक्ष प्रवेश.

Rashmi Mane

नवी मुंबईत पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांचा मुलगा विनीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या पक्षप्रवेशावेळी खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना उपनेते विजय चौगुले यांचेसह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी शिंदे नी मुंबई महापालिका निवडणुकीसंबंधी आपल्या धोरणाबद्दलही स्पष्टपणे मत व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महापालिका निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील हे महत्त्वाचे नाही, तर महायुतीचाच भगवा झेंडा मुंबईवर फडकवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आगामी निवडणुकीनंतर महापौरही महायुतीतून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होऊ शकतात, त्यामुळे शिवसेनेतर्फे मुंबईतील शाखाप्रमुखांसाठी संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या संवादातून पक्षाचे धोरण समजून घेणे आणि आगामी निवडणुकीत तयारी मजबूत करणे हा उद्देश होता. त्यांनी विरोधकांवरही टीका केली. शिंदे म्हणाले की, काम करणाऱ्या पक्षाला मुंबईकरांनी नेहमी पसंती दिली आहे. मात्र, विरोधक जेव्हा निवडणुकीत हारतात, तेव्हा ते ईव्हीएम, न्यायालय किंवा निवडणूक आयोगावर आरोप करतात. त्यांनी हे लोकांना लक्षात ठेवावे असे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे नवी मुंबईतील राजकीय परिस्थितीत मोठा बदल निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बळ मिळू शकते. यामुळे मुंबईतील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा काय परिणाम होईल, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT