Navneet Rana News : राज्यसभा निवडणुकीसाठी उद्या पासून (सोमवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असताना मोठा ट्विस्ट आला आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी दुसऱ्यांदा 'देवगिरी' बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली.
या भेटीमुळे नवनीत राणा यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर आपण जात असू तर आपल्या पुतण्या समीर भुजबळ याला मंत्रिमंडळात घेण्याची अट घेतली आहे.त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित होण्यास अडचण येत असल्याची माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्या पुन्हा देवगिरी बंगल्यावर भेटीसाठी आल्या आहेत. काल (शनिवारी) सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले होते की, भुजबळ यांची उमेदवारी अद्याप फायनल केली नाही. आज संध्याकाळपर्यंत यावर निर्णय घेतला जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार ठरवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहेत. भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवले तर त्यांच्या जागी मंत्रिमंडळात समीर भुजबळ यांना घेण्यासाठी केंद्रातून परवानगी घ्यावी लागेत, असे त्यांनी सांगितल्याची माहिती आहे.त्यामुळे समीर भुजबळ यांच्याबाबत स्पष्ट शब्द मिळत नाही तोपर्यंत राज्यसभेवर जाण्यास छगन भुजबळ तयार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार ठरवताना देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.