Rajya Sabha Election : राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, राज्यसभा उमेदवारीबाबत सस्पेन्स संपणार; कोअर कमिटीच्या बैठकीत भुजबळांसह 'ही' चार नावे चर्चेत

Maharashtra Rajya Sabha Election News : प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक होत असून त्यामध्ये चार नावावर चर्चा केली जाणार असून त्यापैकी एकाचे नाव फायनल केले जाणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Pune MLC Election | NCP Candidate Vikram Kakade Row
Pune MLC Election | NCP Candidate Vikram Kakade RowSarkarnama
Published on
Updated on

Mumbai news : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या दोन्ही जागा बिनविरोध करण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कॉन्फिडन्स भलतेच वाढले आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असतानाही उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम आहे. शनिवारी दुपारी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक होत असून त्यामध्ये चार नावावर चर्चा केली जाणार असून त्यापैकी एकाचे नाव फायनल केले जाणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

राज्यसभा उमेदवारीच्या संदर्भात एकीकडे उत्सुकता लागली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. त्या ठिकाणच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अद्याप निर्णय नाही झालेला नाही. राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. ८ जून सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

Pune MLC Election | NCP Candidate Vikram Kakade Row
Maharashtra Politics Live Update : विजय पाटकर यांच्यावर मेघराज भोसले यांचा पलटवार; 'माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा...'

त्यामुळे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्यसभा उमेदवार ठरविण्याबाबत शनिवारी दुपारी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह दिलीप वळसे पाटील. छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी इच्छुक असलेल्या प्रमोद हिंदुराव, मंत्री छगन भुजबळ, अविनाश आदिक, समीर भुजबळ यांची नाव चर्चेत आहेत. यापैकी एकाची उमेदवारी फायनल होणार आहे. त्यांच्या नावाची घोषणा येत्या दोन दिवसात केली जाणार आहे.

Pune MLC Election | NCP Candidate Vikram Kakade Row
Maharashtra politics : नवनीत राणांना राज्यसभा मिळणार? राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच मोठा खुलासा, स्पष्ट सांगितले, 'आमचा उमेदवार...'

राज्यसभेची जागा खरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे का? ही जागा भाजपकडे जाणार? यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. उद्यापर्यंत राष्ट्रवादी काय निर्णय घेते? या प्रकरणी कोणता नवीन ट्विस्ट येतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दुसरीकडे गेल्या

Pune MLC Election | NCP Candidate Vikram Kakade Row
Dhananjay Munde News: धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहात लवकरच पुन्हा धडाक्यात एन्ट्री? सुनेत्रा पवार मोठी संधी देण्याच्या तयारीत

गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटायला आलेल्या या जगावर माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. त्या राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचेही बोलले जात होते. त्यांनी सीएम फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली असल्याचे समजते. त्यामुळे काय निर्णय घेतला जाणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

Pune MLC Election | NCP Candidate Vikram Kakade Row
Maharashtra MLC election : शरद पवारांच्या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये असंतोष; बड्या नेत्यांच्या नाराजीचा स्फोट : थेट आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी प्रमोद हिंदुराव, छगन भुजबळ, अविनाश आदिक, समीर भुजबळ यांची नाव चर्चेत आहेत, असे समोर येत आहे. आता राज्यसभेची लॉटरी कुणाला लागणार हे येत्या दोन दिवसात समोर येणार आहे. या कोअर कमिटीच्या बैठकीत या चार पैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

Pune MLC Election | NCP Candidate Vikram Kakade Row
MLC election : ऐनवेळी उमेदवाराची माघार,125 मते फोडली! धाराशिव-बीड-लातूरमध्ये पुन्हा 'घोडेबाजार' की मोठा उलटफेर? काँग्रेसमुळे सस्पेन्स वाढला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Navneet Rana
Chhagan Bhujbal,Sunetra Pawar
Sunetra Pawar
Sunetra Pawar
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com