Sameer Wankhede, Nawab Malik sarkarnama
महाराष्ट्र

वानखेडेंनी जातीच्या खोट्या दाखल्याच्या आधारे नोकरी मिळवली!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा जन्माचा दाखला नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विट करीत शेअर केला आहे. जातीचा बनावट दाखला काढून समीर वानखेडेंनी आयआरएसची नोकरी मिळवली, असा आरोप मलिकांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

वानखेडे (Sameer Wankhede) यांचा जन्माचा दाखला व पहिल्या लग्नातील फोटो सोशल मीडियात शेअर करून मलिकांनी (Nawab Malik) खळबळ उडवून दिली. समीर वानखेडे यांनी गैरप्रकार करून नोकरी मिळवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

वानखेडे म्हणाले की, समीर दाऊद वानखडे ही बोगस व्यक्ती असून त्यांनी जन्म दाखल्यात फेरफार करुन (tampering) केला आहे. त्याच्या आधारे त्यांनी जातीचा दाखला काढला आहे.

या जातीच्या दाखल्यांच्या आधारे वानखेडेंनी आयआरएस (IRS)मध्ये नोकरी मिळविली आहे. यामुळे दलित उमेदवाराला त्याचा अधिकारापासून वंचित ठेवलं आहे. धर्मांतर करुन वानखेडेंनी जातीचा खोटा दाखला मिळविला आहे.

त्यांच्या वडिलांनी धर्मांतर करुन नाव बदललं नंतर ते दुरुस्त केलं. वानखेडेंचे संपूर्ण आयुष्य एक बनावट गोष्टींनी सुरु झाली आहे. आताही ते बनावट प्रकरणं बनवित आहेत. त्यांनी आणखी काय बनावट प्रकरणं समोर आणणार आहोत. इनामदार अधिकारी इतका का घाबरत आहेत.

सुरवातीला काही जण हिंदू-मुस्लीम करत होते. नवाब मलिक मुस्लीम, आर्य खान मुस्लीम यावरुन हिंदू-मुस्लीम वातावरण निर्माण केलं जात होतं. जन्मापासून आजपर्यंत समीर वानखेडे मुस्लीम आहेत. त्यांचा जन्माचा दाखला मी प्रसिद्ध केला आहे. हा शोधायला बरेच परिश्रम करावे लागले. त्यांच्या बहिणीचा ऑनलाईन दाखवला मिळतो. त्यात के वानखेडे शब्द वापरले आहेत. दाऊद वानखेडे धर्मांतर केल्यानंतर त्यांनी नाव बदललं होतं. त्याच्या आधारे जन्माचा दाखला काढण्यात आला. नंतर त्यात खोडाखोड सुरु करण्यात आली. इथूनच वानखेडेंची बोगसगिरी सुरु झाली आहे, असे मलिकांनी सांगितले.

एनसीबी अधिकारी समीर दाऊद वानखेडे यांनी आपला खरा जन्माचा दाखला समोर आणावा असे म्हणत नवाब मलिक यांनी पुरावा मागितला आहे. वडीलांचे धर्मांतर लपवून समीर वानखेडेंच्या वडीलांनी नोकरी केली आणि समीर वानखेडे यांनी जातीच प्रमाणपत्र काढून नोकरी मिळवली असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी वानखेडेंवर केला आहे.

मलिकांच्या आरोपांवर वानखेडेंनी पत्राव्दारे स्पष्टीकरण दिलं आहे.

''नवाब मलिक यांनी माझा व माझ्या कुटुंबियांचा सामाजिक माध्यमांवर अपमान केला आहे. माझ्या कुटुंबाची खोटी माहिती ट्विटरवर सांगून त्यात अपमानित करणारी वक्तव्य करण्यात आली आहेत. यामुळे मी व माझे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावात आहेत,'' असं वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटलं आहे. ''माझ्या वडिलांचे नाव ज्ञानदेव कचरुजी वानखेडे आहे. ते उत्पादन शुल्क विभागातील निवृत्त वरिष्ठ निरीक्षक आहेत. माझ्या आईचे नाव झहिदा (आता हयात नाही) आहे. मी बहु धार्मिक व धर्मनिरपेक्ष भारतीय पारंपरिक कुटुंबातील असून त्याचा अभिमान आहे,'' असे वानखेडेंनी पत्रात म्हटलं आहे.

‘माझे नाव समीर दाऊद वानखेडे, असे असल्याचे मलिक यांनी ट्विटरवर म्हटले आहे. मी २००६ मध्ये डॉ. शबाना कुरैशी यांच्याशी विवाह केला व कायद्यानुसार २०१६ मध्ये घटस्फोट देखील झाला. त्यानंतर २०१७ मध्ये मी क्रांती दिनानाथ रेडकर यांच्याशी विवाह केला. परंतु मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सामाजिक माध्यमावर खोटी माहिती पसरवून माझी प्रतिम मलिन करीत आहेत. कुटुंबाची वैयक्तिक माहिती अशाप्रकारे जाहिर करणे हे अपमानित करणारे आहे’, असंही वानखेडे यांनी त्या पत्रात म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT