वानखेडेंना हटविण्यासाठी आता बॉलीवुड मैदानात

नवाब मलिक (Nawab Malik) आणि प्रभाकर साईल यांच्या गैाप्यस्फोटानंतर समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) आरोप होत आहेत.
hansal mehta, sameer wankhede
hansal mehta, sameer wankhede sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आर्यन ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि पंच असलेल्या प्रभाकर साईलने गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे एनसीबी (ncb) मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हे ड्रग्ज प्रकरण रोज वेगळ वळण घेत असताना आता बॉलिवुडनं त्यात उडी घेतली आहे.

नवाब मलिक आणि प्रभाकर साईल यांच्या गैाप्यस्फोटानंतर वानखेडेंवर आरोप होत आहेत. बॉलिवूडमधील चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी समीर वानखेडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत मेहता यांनी टि्वट केलं आहे.

प्रभाकर साईलच्या वक्तव्यानंतर चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्वीट करत समीर वानखेडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ''जोपर्यंत हे गंभीर आरोप खोटे ठरत नाहीत, तोपर्यंत समीर वानखेडेंनी राजीनामा द्यायला हवा. त्यांनी अटक केलेल्यांवरच निर्दोष असल्याचं सिद्ध करण्याची जबाबदारी का टाकावी?','' असा सवालही हंसल मेहता यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र आज सादर केलं. न्यायाधीश वैभव पाटील यांच्या विशेष एनडीपीएस कोर्टात हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. एनसीबी (NCB) आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दाखल केले आ

hansal mehta, sameer wankhede
पहिल्या लग्नाबाबत वानखेडे करणार लवकरच खुलासा..

या गुन्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि ज्या काही तक्रारी होत आहेत, त्याचा परिणाम या गुन्ह्याच्या तपासावर होऊ नये, कारवाईवर होऊ नये, यासाठी एनसीबीचं हे पाऊल उचलल्याचे समजते.

स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपाची कोर्टाला माहिती दिली आहे. स्वतंत्र साक्षीदाराने साक्ष फिरवल्याप्रकरणाची कोर्टाला माहिती देण्यात आली.

एनसीबी (NCB) आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. वानखेडेंनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली. समीर वानखेडे स्वत: कोर्टाला काही माहिती देण्यासाठी साक्षीदाराच्या पिंज-यात उभे राहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com