NCP leader Nawab Malik Sarkarnama
महाराष्ट्र

'बाते कम-काम ज्यादा' हे सरकारचे धोरण; उत्तरप्रदेश म्हणजे जाहिरातबाजी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला ((Mahavikas Aaghadi Government) आज २ वर्ष पुर्ण होत आहेत. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यापासून अनेक मंत्री आणि आमदारांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावाही उद्धव ठाकरे यांनी घेतला. रोज आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि समीर वानखेडे यांच्यासाठी पत्रकार परिषद घेणाऱ्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही आज महाविकास आघाडीला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामाचा आढावा घेतला.

नवाब मलिक म्हणाले, आज महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पुर्ण झाले आहेत. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर नवा प्रयोग करून आघाडी सरकार स्थापन झाले होते. आजच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत पाच मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर सरकार सातत्याने राज्यातील जनतेला न्याय देणे, सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी काम करत आहे. नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती निर्माण होऊनही परिस्थिती हाताळली. सरकारच्या माध्यमातून सगळी माहिती डीजीपीआर, पोर्टलने उपलब्ध करून दिली आहे.

दोन वर्षांचे कामकाज पुर्ण होऊनही काही जण आरोप करत आहेत. पण या काळात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या कामांचा गाजावाजा न करण्याची सरकारची भुमिका आहे. उत्तर प्रदेशात काही काम झाले की जाहिरातबाजी होते. मात्र या बाते कम काम ज्यादा हे या सरकारचे धोरण आहे. कालच सरकारने निर्णय घेतलाय की केवीडमुळ् ज्यांचा मृत्यू त्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा १४.५० लाख लोकांना फायदा झाला.

शिवभोजन थाळी योजनेवर १५४६ कोटी खर्च केला. तीन महिने सेंट्रल किचनने जेवण पुरवले. गरिबांना २ वेळच्या भोजनाची सोय केली. १० रुपयांत जेवण दिले. तोक्ते, अतिवृष्टी, पूरपरिस्थीती अशा संकटात आधार दिला. राज्य सरकारने लोकांना ११ हजार ७५२ कोटींची मदत केली. इतरत्र जी परिस्थिती निर्माण झाली तशी परिस्थिती इथे निर्माण करू दिली नाही. मेट्रो, रस्ते, सगळी कामे व्यवस्थिती सुरू आहेत असेही मलिक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT