मूड महाराष्ट्राचा : जाणून घ्या महाराष्ट्राची राजकीय हवा

सकाळ व सामने महाराष्ट्रभरातून केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष
Mood Maharashtra
Mood Maharashtra sarkarnama
Published on
Updated on

मविका सरकारची प्रतिमा:

- वाझे, ईडी या प्रकरणांमध्ये सरकारची बाजू बहुसंख्य जनतेने अजून तरी लावून धरलेली आहे.

- सरकारची प्रतिमा उद्ध्वस्त झाल्याचे २२ टक्के जनतेला वाटते आहे; मात्र प्रतिमेवर फरक पडलेला नाही आणि प्रतिमा मलिन झालेली नाही असं वाटणाऱ्यांची एकत्रित संख्या सुमारे तब्बल ६६.१ टक्के आहे.

Mood Maharashtra
जनतेचा कल पाहून आनंद; पण विरोधकांना कमी लेखून चालणार नाही : गोऱ्हे

कोरोना हाताळण्यात बहुसंख्य जनता सरकारच्या कामाबद्दल सकारात्मक -

सरकार स्थापनेपासूनचा पुढचा काळ कोरोना महामारीशी लढण्यात गेला. सरकार, सरकारमधले मंत्री, विरोधी पक्षांचे नेते यांच्या दृष्टीने हा काळ आव्हानात्मक होता. या काळात राज्य सरकारच्या कामाबद्दल बहुसंख्य जनतेची सकारात्मक भावना आहे. जनता सरकारच्या पाठीशी राहिल्याचे चित्र आहे.

कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार कमी पडल्याचं सुमारे २५.६ टक्के लोकांना वाटतं.

- महाराष्ट्रात २३ नोव्हेंबर अखेर ६६.३१ लाख कोरोना रूग्ण आढळले. त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या उपाययोजनांबद्दल सरसकट नाराजी नाही.

सरकारने ही कामगिरी उत्तम रितीने पार पाडली असं ३४.६ टक्के लोकांना वाटते. तर कामगिरी समाधानकारक असल्याचे ३६ टक्के लोकांचे मत आहे. केवळ ११ टक्के नागरिकांनी सरकारच्या कामाबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

-------------

कोरोना निर्बंध हटविण्याचे निर्णय

कोरोना काळातील सरकारच्या उपाययोजनांबद्दलची सकारात्मक भावना निर्बंधांबद्दलच्या मतप्रदर्शनातही कायम राहिली आहे. निर्बंध योग्य काळासाठी होते, असं बहुसंख्य लोकांना वाटतं; निर्बंध उठविण्यात उशीर झाल्यानं नुकसान झाल्याचं सुमारे ९.५ टक्के लोकांना वाटतं. ५६ टक्के लोकांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांबाबत समाधान व्यक्त केले आहे.

आमदारांची कामगिरी

आपल्या मतदारसंघाच्या आमदाराच्या कामगिरीबद्दल अतिशय समाधानी व समाधानी असलेल्यांचे प्रमाण ६१ टक्के आढळले. त्यापैकी सुमारे ४० टक्क्यांनी आपण आमदारांच्या कामगिरीबद्दल समाधानी असल्याचं मत नोंदवलं तर २० टक्के अतिशय समाधानी असल्याचे दिसले.

- तब्बल ३१.१ टक्के लोक आमदारांच्या कामाबद्दल समाधानी नाहीत. हा मुद्दा महत्वाचा आहे. तर एक तृतियांश लोकांना आमदारांच्या कामाबाबत सुधारणा हवी आहे.

सध्या राज्यात काय चालू आहे? अनिल देशमुख आणि परमबीर सिंग प्रकरणाचा परिणाम त्या त्या पक्षावर झाला आहे. विचारधारेचा मुद्दा संपला आहे. सेक्युलर मताचा टक्का १ इतका आहे. मोदींच्या बाबत सांगायचे झाल्यास, त्यांनी जसे आपल्याला सगळे त्रास देतात असे चित्र निर्माण केले होते. भाजपची स्पेस कुठे असेल तर... तिकिट न मिळालेले नाराज यांच्यावर त्यांची मोठी भिस्त असेल. सेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष सुरु असणाऱ्या ठिकाणी भाजपने बाजी मारलीये.

- विश्वंभर चौधरी

Mood Maharashtra
मूड महाराष्ट्राचा : जाणून घ्या महाराष्ट्राची राजकीय हवा

राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी म्हणतात,

काँग्रेसला फॅक्टर म्हणून वाढताना दिसत आहे. सर्व्हेतील आकडेवारी पाहिली की, काही कमी आहे. कित्येक ठिकाणी प्रादेशिक पक्षांमधील संघर्ष आहे. लोकांच्या भावना यावेळी महत्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे.

सत्यजित तांबे म्हणतात,

मला हा समाधानकारक सर्व्हे वाटतो. राज्यातील लोकांना दिलासा देणारं सरकार आहे असे त्यातून वाटते. यापुढील काळामध्ये आम्हाला आमची भूमिका सिध्द करता येणार आहे. ज्या निवडणूका होणार आहे त्यात काय घडामोडी घडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आज निवडणूक झाल्यास

- आतापर्यंतच्या सर्व प्रश्नांना जो कौल महाराष्ट्रातील जनतेने दिला, तोच या प्रश्नावर कायम राहिला आहे.

- पक्ष म्हणून सारे स्वतंत्र लढल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे २७.९ टक्के जनाधार राहील; त्याखालोखाल शिवसेनेला २४ टक्के जनाधार राहील. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शेवटी काँग्रेस असा कौल आहे.

- विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपला २५.७५, शिवसेनेला १६.४१, राष्ट्रवादीला १६.७१ आणि काँग्रेसला १५.८७ टक्के मतदान झाले होते. जवळपास तोच क्रम आताही कायम आहे.

महाविकास आघाडी विरूद्ध भाजप?

भाजपचा मतदार भक्कमच; काँग्रेस वगळून तर महाविकास आघाडी अशक्य

सत्तेवर राहायचे असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला काँग्रेसला सोबत घ्यावेच लागेल, असा महाराष्ट्राचा आजचा कौल आहे. सर्व्हेक्षणात ३९.८ टक्के लोकांना काँग्रेससह महाविकास आघाडी असेल, तरच आघाडीला मतदान करायचे आहे.

महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढत झाल्यास भाजपलाच मतदान करू, असे सांगणाऱ्यांचे प्रमाण २७.५ टक्के आहे. म्हणजे भाजपच्या मतदानात फारशी घट होईल, असे चित्र नाही.

काँग्रेसला वगळले, तर महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची चिन्हे नाहीत. कारण, राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला केवळ १९.८ टक्के कौल आहे.

हा महाराष्ट्रातील मतदारांची मानसिकता सांगणारा कौल वाटतो. एकत्र राहा, तरच भाजपला विरोधात ठेवू, असा मतदारांचा महाविकास आघाडीला संदेश आहे.

`सकाळ` व `साम`ने राज्यभरात सर्वेक्षण करून महाराष्ट्राची राजकीय हवा जाणून घेतली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com