Nawab Malik
Nawab Malik  sarkarnama
महाराष्ट्र

कॉग्रेस आमच्यासोबत आली तर भाजपला हरविणं सोपं !

सरकारनामा ब्युरो

मुंबई : उत्तरप्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार आहे. शिवसेना स्वबळावर लढणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शेतकरी नेते राकेश टीकैत यांची भेट घेतली. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस कुणासोबत जाणार, याबाबत गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भूमिका स्पष्ट केली. ते माध्यमांशी बोलत होते.

नवाब मलिक म्हणाले, ''उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh Assembly Election) भाजपचा जो अहंकार आहे, तो आता संपला आहे. राजीनाम्याचे चित्र पाहायला मिळत आहे, हे त्यांचेच उत्तर आहे. आम्ही समाजवादी पार्टीसोबत आहोत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची अखिलेश यादव यांच्यासोबत चर्चा होणार आहे.

''नव्वदच्या दशकानंतर कॉग्रेस कमजोर होत चालली आहे. उत्तरप्रदेशातही कॉग्रेसची तीच परिस्थिती आहे. उत्तरप्रदेशात जो पक्ष मजबूत आहे, त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत. कॉग्रेसपण आमच्यासोबत आला तर भारतीय जनता पक्षाला हरविणं सोप्प जाईल,'' असे नवाब मलिक यांनी सांगितलं.

''उत्तर प्रदेशामध्ये जर शिवसेना स्वबळावर लढणार आहे. तर आम्ही काही नाही करू शकत नाही, पण हा अधिकार आम्ही अखिलेश यादव यांना दिला आहे. त्यांनी जर विचार केला तर होऊ शकते,'' असे मलिक यांनी सांगितले.

''गोव्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. कॉग्रेससोबत आम्ही होतो. यावेळी कॉग्रेसनी जर भूमिका घेतली असती तर भाजपची सत्ता नसती. हेच राजकारण अजूनही सुरू आहे. व्यक्ती छोटा असतो आणि पक्ष मोठा असतो, अजूनही शिवसेना, कॉग्रेस आणि आम्ही एकत्र लढलो पाहिजे, आमची तयारी आहे. पण त्यांना ते मान्य करायला हवी,'' असे मलिक म्हणाले.

शिवसेना गोव्यासह उत्तर प्रदेशच्या रिंगणात उतरणार आहे. ''उत्तर प्रदेशात शिवसेना कोणत्याही आघाडीत नाही. समाजवादी पक्षासोबत आमचे वैचारिक मतभेद आहेत. पण या राज्यात आम्हालाही बदल हवा आहे. मागील अनेक वर्षांपासून आमचा पक्ष उत्तर प्रदेशात काम करीत आहे. पण भाजपला दुखवायचे नव्हते, म्हणून निवडणूक लढलो नाही, असं राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT