NCB sarkarnama
महाराष्ट्र

मोठी बातमी : NCBकरणार 'त्या' सहापैकी 'या' तीनच प्रकरणांचा तपास

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) एसआयटीने (SIT)कडे असलेल्या सहा प्रकरणापैकी आता तीन प्रकरणाची चैाकशी करणार आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानसह एकूण सहा प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून तो दिल्लीच्या एनसीबीच्या टीमकडे सोपविण्यात आला आहे. त्याचे नेतृत्व एनसीबीच्या दिल्ली कार्यालयातील आयपीएस संजय सिंह करीत आहे. पण आता यातील तीन प्रकरणे वगळण्यात आली आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) एसआयटीने (SIT)कडे असलेल्या सहा प्रकरणापैकी आता तीन प्रकरणाची चैाकशी करणार आहे. अन्य तीन प्रकरण एसआयटीनं वगळली आहेत. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राला एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

एनसीबी एसआयटी आता फक्त समीर खान, आर्यन खान आणि अरमान कोहली प्रकरणाची चौकशी करणार असून अन्य तीन प्रकरणं वगळली आहेत.आयपीएस संजय सिंह यांच्या नेतृत्वात दिल्लीची टीम ही एकूण सहा प्रकरणाचा तपास करणार आहे. संजय सिंह यांची मुंबईचे झोनल म्हणून नियुक्ती झाली नसून ते या सहा प्रकरणांचा तपास करणार होते. त्यांची टीम आता तीनच प्रकरणाचा तपास करणार आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान याच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणाची चौकशी करेल, ज्यामध्ये आधीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सुरुवातीला सहा प्रकरणे एसआयटीकडे हस्तांतरित करण्यात आली होती, परंतु उर्वरित तीन प्रकरणांमध्ये कोणतेही परदेशातील दुवे अस्तित्वात नसल्याची माहिती मिळाली आणि एनसीबीच्या चौकशीतून वगळण्यात आले. वगळण्यात आलेल्या तीन प्रकरणांमध्ये आरोपींमध्ये ओळखीची व्यक्ती नव्हती. मुंबईत मुंब्रा, जोगेश्वरी आणि नागपाडा येथे किरकोळ अमली पदार्थ जप्त करण्यासंबंधीचे तीनही गुन्हे दाखल झाले आहेत.

मलिकांचा गैाप्यस्फोट ; सॅम डिसोझा हा वानखेडेंचा ड्रग्ज डीलर

मुंबई : ''पैशाचा वापर करुन सरकार पाडता येत नाही. मलाही वारंवार ईडीकडून धमकवण्यात येत आहे. पर्याय संपतात तेव्हा दंगली घडविल्या जातात. ही भाजपच्या जुनी पद्धत आहे. भाजपनं नकारात्मक राजकारण करु नये,'' असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मलिकांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंबाबत (Sameer Wankhade) गैाप्यस्फोट केला. ''मालेगावचा अटक झालेला नगरसेवक हा राष्ट्रवादीचा नसून तो एमआयएमचा आहे,'' असे मलिक म्हणाले. ''कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणी NCBचे अधिकारी समीर वानखेडे यांनी तक्रारी केल्या आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसाकडून (SIT) तपास सुरू आहे. सॅम डिसोझा यांची व्हिडिओ क्लिप आम्ही दाखवली होती,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT