NCBची मोठी कारवाई : १५०० किलो गांजा जप्त, दोघे ताब्यात

एनसीबीच्या कारवाईत २ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. एनसीबी (NCB)हे ड्रग्ज हे कुठे घेऊन जात होते याची माहिती घेण्यात येत आहे.
ncb seized 1500 kgs of ganja in jalgaon
ncb seized 1500 kgs of ganja in jalgaonsarkarnama
Published on
Updated on

जळगाव : अमल पदार्थ विरोधी पथकाने (NCB) एरंडोल (जि. जळगाव) (jalgaon) कारवाई करीत १५०० किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम् येथून आणला जात होता.

विशाखापट्टण येथून आणण्यात आले असून, या कारवाईत २ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. एनसीबी (NCB)हे ड्रग्ज हे कुठे घेऊन जात होते याची माहिती घेण्यात येत आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून मुबंई मोठ्या प्रमाणात अमल पदार्थ विरोधी पथकाकडून (एनसीबी) कारवाया केल्या जात आहेत. एनसीबीने अनेक ड्रग्ज पॅडलर्सच्या विरोधात मोहिम उघडली आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये ड्रग्जच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. गुजरात एटीएसने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जच्या (Drugs) विरोधात मलिया मियाना येथून 120 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

ncb seized 1500 kgs of ganja in jalgaon
काही राजकीय पक्षाचे घटक नैराश्यातून बंदचा निर्णय घेतात हे दुर्दैव!

पाकिस्तानातूनच हे अंमली पदार्थ भारतात आणले जात असल्याची माहिती आहे. या ड्रग्जची बाजारातील किंमत अंदाजे 600 कोटी रुपये असल्याचे समजते. या प्रकरणाचे धागेदोरे पाकिस्तानातील ड्रग माफिया खालिद बख्शशी (Khalid Bakhsh) संबंधित असल्याचे समजते. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

भारतात पाठवण्यात आलेल्या या ड्रग्जचा प्लॅन दुबई येथे रचला असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. पाकिस्तानी ड्रग्ज माफिया खालिदने जब्बार आणि गुलाम नावाच्या दोन भारतीय तस्करांची दुबईतील सोमालिया कॅन्टीनमध्ये भेट घेतली होती. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे

गेल्या आठवड्यात गुजरातमधील पोलिसांनी देवभूमी द्वारका आणि सुरतमध्ये हेरॉइनसह अनेक अंमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईमध्ये तीन जणांना अटक करण्यात आली होती. देवभूमी द्वारका येथील ड्रग्ज पॅडलरकडून 88.25 कोटी रुपये किमतीचे 17 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com