Nawab Malik News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर झाली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही यादी निवडणूक आयोगाला दिली. यात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील आर्थिक मालमत्तांशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी आरोप असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांचेही नाव आहे. याच मलिक यांना आता न्यायालयाने दणका दिला आहे.
सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) खटला हा अंदाज आणि तर्कांवर आधारित असल्याचा दावा मलिक यांनी करून दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. पण न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. मलिक यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने मलिक यांना दोषमुक्त करण्यास नकार दिला. न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी 11 नोव्हेंबरला याचिका फेटाळली होती. त्या आदेशाची प्रत गुरुवारी उपलब्ध झाली.
मलिक यांनी डी कंपनीच्या सदस्यांसह हसीना पारकर, सलीम पटेल आणि आरोपी सरदार खान यांच्याशी संगनमत करून बळकावलेल्या मालमत्तेच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभाग आहे. सर्व आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना मलिक यांच्याविरोधात आरोप केले होते. यानंतर ईडीने मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.
नेमके आरोप काय?
हसीना पारकर, सलीम पटेल, १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप आहे. या महिलेने १९९९ मध्ये सलीम पटेलच्या नावाने 'पॉवर ऑफ 'अॅटर्नी' जारी केली.
पटेलने त्याचा दुरुपयोग करून पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कम्पाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी ही जागा भाडेतत्त्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांतून वांद्रे, कुर्ला येथे सदनिका आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.