Sinnar BJP Politics: भाजपने उद्धव ठाकरेंच्या खासदाराचे घर फोडले, काकांनाच नगराध्यक्षपदाची ऑफर देऊन लावले गळाला!

Impact of Sinnar political controversy on upcoming municipal elections: माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल होणार.
Rajabhau waje & Hemant Waje
Rajabhau waje & Hemant WajeSarkarnama
Published on
Updated on

Sinnar mayor post controversy: क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे आणि भाजप अशी तिरंगी लढत सिन्नरला आहे. यामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची उमेदवारी देताना सगळ्याच नेत्यांची तारेवरची कसरत आहे.

सिन्नरला विधानसभा निवडणुकीचे राजकीय पडसाद नगरपालिका निवडणुकीत उमटले आहे. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपले कट्टर विरोधक उदय सांगळे यांना झिडकारले. त्यामुळे भाजपत गेलेल्या सांगळे यांनी भाजपतर्फे स्वबळावर निवडणुकीची घोषणा केली आहे.

सिन्नरला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची सत्ता आहे. त्यामुळे खासदार वाजे यांच्याकडे इच्छुकांची रीघ लागली आहे. अशा स्थितीत चार ते पाच इच्छुकांमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? हे ठरविताना त्यांनी आपले पत्ते राखून ठेवले आहेत.

Rajabhau waje & Hemant Waje
Bihar Election Results : निकालाची उत्सुकता शिगेला, महाराष्ट्रातील बिहारी कामगारांची आज कामाला दांडी!

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अद्याप सिन्नरला दौराच केलेला नाही. आज क्रीडा मंत्री कोकाटे सिन्नरला इच्छुक नगरसेवक आणि समर्थकांची चर्चा करतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची चिन्हे आहे.

Rajabhau waje & Hemant Waje
Girish Mahajan: फडवीसांसमोरच गिरीश महाजनांचा अजब दावा; दहा-पंधरा हजार लोक नाशिक सोडून पळाले, कारण ...

सिन्नरच्या निवडणुकीत क्रीडा मंत्री कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे हे एकमेकांचे परंपरागत राजकीय शत्रू आहेत. आजवर निवडणूक या दोन गटांमध्येच होत आली आहे. यंदा पहिल्यांदा वाजे यांच्यापासून दूर गेलेले उदय सांगळे हे शिवसेना शिंदे पक्षाबरोबर युती करून तिसरा पॅनल करीत आहेत.

या सर्व घडामोडीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवाराच नसलेल्या भाजपला मोठे यश आले आहे. खासदार वाजे गटाकडून उमेदवारीची शक्यता नसल्याने माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे नाराज होते. नाराज हेमंत वाजे यांना भाजपने आपल्या गळाला लावले आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने खासदार वाजे यांच्यात गृहकलह निर्माण केला.

माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी विमानतळावर भेट घेतली. त्यावेळी त्यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा शब्द देण्यात आला. त्यानंतर आज सकाळी त्यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश निश्चित झाला आहे.

महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने भाजपला जवळ केले नाही. दुसरीकडे खासदार वाजे यांनी मात्र महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेतले आहे. त्यामुळे सिन्नरमध्ये पहिल्यांदाच तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हा कळीचा मुद्दा असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com